Mv act 1988 कलम २१६ : अडचणी दूर करण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१६ :
अडचणी दूर करण्याचे अधिकार :
१) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणणत्या कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या तर, केंद्र शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून अशा अडचणी दूर करण्यासाठी त्याला आवश्यक व इष्ट वाटतील अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करू शकेल.
परंतु असे की, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारकेपासून तीन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
२) या कलमान्वये करण्यात आलेला प्रत्येक आदेश तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे मांडण्यात येईल.

Leave a Reply