Mv act 1988 कलम २१५ब(ख) : १.(राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१५ब(ख) :
१.(राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड :
१) केन्द्र शासन, शासकीय राजपत्रात अधिसूचनेद्वारे अधिसूचित करुन राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड स्थापन करेल त्यामध्ये केन्द्र शासनाने विनिर्दिेष्ट केलेल्या अटी आणि शर्ती अन्वये अध्यक्ष, राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणारे आणि योग्य वाटतील ऐवढे इतर सदस्य असतील;
२) राष्ट्रीय बोर्ड, केन्द्र शासनाला किंवा राज्य शासनाला यथास्थिति मार्ग सुरक्षिततेच्या बाबतीत आणि वाहतूक व्यवस्थापना बाबतीत सल्ला देईल, परंतु तो निम्नलिखित मर्यादेपर्यन्त नसेल –
(a)क) अ) मोटार वाहन आणि सुरक्षा उपस्कर आराखडा, वजन, बांधनी, निर्माण करण्याची प्रक्रिया, आणि आणि अनुरक्षणाची मानके;
(b)ख) ब) मोटार वाहनांची नोंदणी आणि लायसन देणे;
(c)ग) क) मार्ग सुरक्षा, रस्ते पायाभूत सुविधा आणि वाहतूक नियंत्रण यासाठी मानके;
(d)घ) ड) सुरक्षितेतेच्या सोयी आणि मार्गावरील वाहतुकीचा पर्यावरणपुरक वापर;
(e)ङ) ई) वाहनाच्या नवीन तंत्रज्ञानाला चालना देणे;
(f)च) फ) असुरक्षित रस्ता वापरकत्र्याची सुरक्षा;
(g)छ) ग) ड्रायव्हर्स आणि इतर रस्ता वापरकत्र्यांना शिक्षित आणि संवेदनशील करण्यासाठी कार्यक्रम; आणि
(h)ज) ह) केन्द्र शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर कार्ये.)
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply