मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१५ड(घ) :
१.(राज्य शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार :
१) राज्य शासन कलम २१५ब मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबीं व्यतिरिक्त, या प्रकरणाच्या उपबंधाना कार्यान्वित करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल.
२) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारतेला हानी न पोचवता, अशा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील :-
२) पूर्वगामी शक्ति की व्यापकता पर प्रतिकूल प्रभाव डाले बिना, ऐसे नियमों में निम्नलिखित के लिए उपबंध हो सकेगा –
(a)क)अ) कलम २११अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे दाखल करणे, लायसन देणे, मंजुरी, शेरा मारुन देणे, परवाना आणि रक्कम मिळाल्याची किंवा दिल्याची पावती देणे यासाठी इलैक्ट्रॉनिक नमुने आणि साधनांचा वापर;
(b)ख)ब) मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि कार्य आणि त्याचे निवर्हन, अशा अधिकाऱ्यांद्वारे वापरले जाणारे अधिकार (या अधिनियमान्वये पोलिस अधिकाऱ्यांचे असलेल अधिकार यांसह) आणि असे अधिकार वापरांवर नियंत्रण करण्याचे अधिकार आणि शर्ते, त्यांच्या मार्फत वापरला जाणारा गणवेश, कलम २१३ च्या पोटकलम (३) मध्ये निर्दिष्ट केलेले प्राधिकारी आणि ज्याच्या ते अधीनस्थ असतील; आणि
(c)ग) क) कलम २१३ च्या पोटकलम (५) च्या खंड (फ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मोटार वाहन विभागातील अधिकारी यांनी वापरायचे अन्य अधिकार;
(d)घ) ड) अशा अन्य बाबी, ज्या विहित करणे बाकी आहे, ज्याच्या संबंधित राज्य शासन नियम बनविणे बाकी आहे.)
——-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.