Mv act 1988 कलम २१४ : मूळ प्राधिकरणाने काढलेल्या आदेशांवरील अपील व पुनरीक्षणाचे परिणाम :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१४ :
मूळ प्राधिकरणाने काढलेल्या आदेशांवरील अपील व पुनरीक्षणाचे परिणाम :
१) या अधिनियमान्वये मूळ प्राधिकरणाने काढलेल्या कोणत्याही आदेशाच्याविरूद्ध अपील किंवा पुनरीक्षणासाठी अर्ज करण्यात आला असेल, अशा बाबतीत विहित अपील प्राधिकरणाने किंवा फेरतपासणी प्राधिकरणाने अन्य निदेश दिले नसतील तर, असे अपील किंवा फेरतपासणी अर्ज निकालात काढण्यासाठी प्रलंबित असेपर्यंत असे अपील किंवा फेरतपासणी अर्ज मूळ प्राधिकरणाने दिलेल्या आदेशासाठी स्थगिती देणारा ठरणार नाही आणि असा मूळ आदेश अमलात राहील.
२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, परवान्याच्या नवीकरणासाठी एखाद्या व्यक्तीने केलेला अर्ज मूळ प्राधिकरणाकडून नाकारण्यात आला असेल आणि अशा व्यक्तीने अशा नाकारण्याविरूद्ध या अधिनियमान्वये अपील किंवा फेरतपासणी अर्ज केला असेल तर अपील प्राधिकरण किंवा यथास्थिती फेरतपासणी प्राधिकरण आदेशाद्वारे असा निदेश देऊ शकेल की, त्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला कालावधी समाप्त झालेला असला तरीही अपील किंवा फेरतपासणी अर्ज निकालात काढण्यात येईपर्यंत कायदेशीर असेल.
३) सक्षम प्राधिकरणाने या अधिनियमान्वये काढलेल्या कोणत्याही आदेशामध्ये कोणतीही चूक, वर्णन किंवा कार्यवाहीची अनियमितता आहे या कारणासाठी अपील किंवा फेरतपासणीत बदल किंवा फेरफार करण्यात येता कामा नये. परंतु अशा चुकीमुळे अशा चुकीमुळे वर्जनामुळष किंवा अनियमिततेमुळे न्याय निष्पळ ठरतो असे विहित अपील प्राधिकरणाला किंवा फेरतपासणी प्राधिकरणाला वाटता कामा नये.

Leave a Reply