मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१२ :
नियम व अधिसूचना प्रसिद्ध करणे, त्यांचा प्रारंभ करणे व ते घालून देणे :
१) या अधिनियमान्वये नियम करण्याचे अधिकार नियम पूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर करण्यात येतील या शर्तीच्या अधीन असतील.
२) या अधिनियमान्वये करण्यात आलेले सर्व नियम शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील आणि नंतरची कोणतीही तारीख नेमून देण्यात आलेली नसेल तर ते अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आल्याच्या तारखेपासून अमलात येतील.
३) राज्य शासनाकडून करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर राज्य विधानमंडळापुढे मांडण्यात येईल.
४) केंद्र शासनाने या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, कलम ७५ च्या पोट-कलम (१) नुसार आणि कलम १६३ च्या पोट-कलम (१) नुसार केंद्र शासनाने केलेली प्रत्येक योजना आणि कलम ४१ चे पोट-कलम (४), कलम ५८ चे पोट-कलम (१) कलम ५९ चे पोट-कलम (१), कलम ११२ चे पोट-कलम (१) चे परंतुक, १.(कलम ११८),२.(कलम १६३क चे पोट-कलम (४)), ३.(कलम १७७क) आणि कलम २१३ चे पोट-कलम (४) या नुसार केंद्र शासनाने काढलेल्या अधिसूचना त्या करण्यात किंवा काढण्यात आल्यानंतर लवकरात लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहात, अधिवेशन चालू असताना एक, दोन किंवा अधिक लागोपाठच्या सभांदरम्यान एकूण तीस दिवसांच्या कालावधीसाठी मांडण्यात येतील ते सत्र किंवा ती दोन सत्रे किंवा उपरोक्तप्रमाणे ती लागोपाठची सत्रे संपण्यापूर्वी त्या नियमात, योजनेत किंवा अधिसूचनेमद्ये फेरबदल करण्याबाबत किंवा ते नियम, योजना करण्यात येऊ नयेत किंवा अधिसूचना काढण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे एकमत झाल्यास ते नियम, योजना किंवा अधिसूचना एकतर अशा बदल केलेल्या स्वरूपात अमलात येतील किंवा यथास्थिती अजिबात अमलात येणार नाहीत; तसेच फेरबदल करणे किंवा रद्द करणे यामुळे या नियमानुसार योजनेनुसार किंवा अधिसूचनेनुसार यापूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या कायदेशीरपणास बाध येणार नाही.
४.(५) कलम २१०अ अन्वये काढलेली प्रत्येक अधिसूचना राज्य शासन ती तयार केल्यानंतर राज्य विधीमंडळाच्या प्रत्येक समागृहापुढे जी दोन सभागृहे मिळून असेल, किंंवा ज्यावेळेस आा विधानसभेचे एक सभागृह असेल तर त्या सभागृहापुढे संपूर्ण तीस दिवसांच्या कालावधीसाठी जी एका सत्रात किंवा दोन दोन किंवा लागोपाठच्या दोन सत्रात चालू असेल, आणि जर, सत्र संपल्यानंतर त्वरित नंतरच्या सत्रात किंवा त्यानंतरच्या लागोपाठच्या सत्रामध्ये सभागृह मान्य करेल किंवा दोन्ही सभागृह मान्य करतील, यथास्थिति अधिसूचनेमध्ये कोणताही बदल केला असेल, किंवा सभागृह मान्य करेल किंवा दोन्ही सभागृहे मान्य करतील, तर ती अधिसूचना काढली जाणार नाही, अधिसूचना आा बदलामध्ये यथास्थिति लागू होर्सल किंवा होणार नाही म्हणून अशी कोणतीही अधिसूचना qकवा रद्द केलेली कोणतीही अधिसूचना पूर्वी केलेल्या अधिसूचनेखाली विहित होणार नाही.)
—————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ६२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.