मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २११अ(क) :
१.(कागदपत्रे आणि नमुने यांचा वापर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करणे :
१) जिथे या अधिनियमानुसार बनविलेले नियम आणि विनियमाचा कोणताही उपबंध निम्नलिखित साठी उपबंध करतात ,-
(a)क)अ) केन्द्र शासन किंवा राज्य शासनाचे मालकीची किंवा नियंत्रणा खालील कोणतेही कार्यालय, संस्था किंवा एजन्सी यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अर्ज किंवा अन्य दस्तावेज अशा पद्धतीने सादर केले जातील;
(b)ख)ब) कोणतेही लायसन, परवाना, मंजूरी, मान्य करणे किंवा पोच दणे मग ते कोणत्याही नावाने विशिष्ट पद्धतीत ज्ञात असोत; किंवा
(c)ग) क) कोणत्याही विशिष्ट पद्धतीने रक्कम घेणे किंंवा देणे,
तर अशा तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अशी अपेक्षा पूर्ण केली असे समजले जाईल की यथास्थिती असे दाखल करणे, देणे मान्य करणे, रक्कम स्विकारणे किंंवा देणे, इलेक्ट्रॉनिक नमुन्यातून, जे केन्द्र शासन किंवा राज्य शासन विहित करील अशा माध्यमातून केले जाते.
२) केन्द्र शासन किंवा राज्य शासन पोटकलम (१) च्या प्रयोजनासाठी विनिर्दिष्ट करेल –
(a)क)अ) असे इलैक्ट्रॉनिक नमुने आणि कागदपत्रे दाखल करणे, जतन करणे, किंवा देरे याची पद्धत व स्वरुप; आणि
(b)ख)ब) खंड (अ) अन्वये इलैक्ट्रॉनिक कागदपत्रे दाखल करण्यासाठी, जतन करण्यासाठी , देण्यासाठी कोणतेही शुल्क घेण्याची पद्धत किंवा रित;)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९० अन्वये समाविष्ट करण्यात आले.