मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २० :
अपात्र ठरविण्याचा न्यायालयाचा अधिकार :
१) एखाद्या व्यक्तीला या अधिनियमाखालील अपराधासाठी किंवा जो करण्यासाठी मोटार वाहनाचा वापर करण्यात आला असेल, अशा अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले असेल अशा बाबतीत, ज्या न्यायालयाने अशा व्यक्तीला दोषी ठरविले असेल ते न्यायालय या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, कायद्याद्वारे प्राधिकृत करण्यात आली असेल, अशी कोणतीही शिक्षा देण्याबरोबरच अशाप्रकारे दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तींना, न्यायालय विनिर्दिष्ट करील अशा कलावधीसाठी, अशा लायसनमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सर्व प्रकारची आणि वर्णनाची वाहने चालविण्याचे किंवा त्यांपैकी कोणत्याही विशिष्ट वर्गाची किंवा वर्णनाची वाहने चालविण्याचे लायसन धारण करण्यास अपात्र म्हणून घोषित करू शकेल :
परंतु, कलम १८३ खाली शिक्षायोग्य असलेल्या एखाद्या अपराधाच्या संबंधात, पहिल्या किंवा दुसऱ्या अपराधाच्या बाबतीत असा आदेश काढण्यात येणार नाही.
२) कलम १३२, पोट-कलम (१) चा खंड (क), कलम १३४ किंवा कलम १८५ खालील अपराधासाठी एखाद्या व्यक्तीला दोषी ठरविण्यात आले असेल अशा बाबतीत, अशा कोणत्याही अपराधासाठी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरविणारे न्यायालय, पोट-कलम (१) अन्वये अपात्रतेचा आदेश काढील आणि तो अपराध कलम १३२, पोटकलम (१) च्या खंड (क) शी किंवा कलम १३४ शी संबंधीत असल्यास अशी अपात्रता एक महिन्यापेक्षा कमी नाही अशा कलावधीसाठी असेल आणि तो अपराध कलम १८५ शी संबंधित असल्यास अशी अपात्रता सहा महिन्यांपेक्षा कमी नाही अशा कलावधीसाठी असेल.
३) ज्या व्यक्तीला-
(a)क) अ) कलम १८४ खाली शिक्षापात्र अशा अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आल्यानंतर पुन्हा त्याच कलमाखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधासाठी दोषी ठरवण्यात आले असेल,
(b)ख) ब) कलम १८९ अन्वये शिक्षायोग्य असलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल, किंवा
(c)ग) क) कलम १९२ अन्वये शिक्षायोग्य असलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल,
अशा बाबतीत कारणे लेखी नमूद करून अन्य आदेश काढणे योग्य आहे असे न्यायालयाला वाटेल, ते खेरजी करून न्यायालय त्या व्यक्तीला अपात्र ठरविणारे आदेश काढील
परंतु, अपात्रतेचा कालावधी खंड (अ) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये पाच वर्षापेक्षा जास्त असणार नाही, खंड (ब) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या प्रकरणात दोन वर्षांपेक्षा जास्त असणार नाही किंवा खंड (क), मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या प्रकरणात एक वर्षांपेक्षा जास्त असणार नाही.
४) कलम १८४ खाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीला असल्याबाबतचा आदेश देणारे न्यायालय असा निदेश देऊ शकेल की, ती व्यक्ती कलम ९ च्या पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली चालकाची सक्षमता चाचणी त्यापूर्वी उत्तीर्ण झालेली असो अथवा नसो, असा अपात्र ठरविणारा आदेश काढण्यात आल्यानंतर लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे समाधान होईल अशा रीतीने ती चाचणी उत्तीर्ण होईपर्यंत ती व्यक्ती अपात्रच राहील.
५) पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आल्याबद्दल सर्वसाधारणपणे ज्या न्यायालयाकडे अपील करता येते असे न्यायालय, ज्या दोषसिद्धीच्या परिणामी अपात्रता आदेश काढण्यात आला असेल त्या दोषसिद्धीच्या बाबतीत अपील दाखल करता येत नसले तरीही, अशी कोणतीही अपात्रता रद्द करू शकेल किंवा त्यात फेरबदल करू शकेल.