मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०९ :
अपराध सिद्धीवरील निर्बंध :
कलम १८३ किंवा कलम १८४ अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधासाठी खटला भरण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला-
(a)क)अ) अपराध करण्यात आला तेव्हा, त्याच्यावर खटला भरण्याचा प्रश्न विचारात घेण्यात येईल अशा आशयाचा इशारा देण्यात आलेला असल्याशिवाय; किंवा
(b)ख)ब) अपराध करण्यात आल्यापासून चौदा दिवसांच्या आत अपराधाचे आणि तो अपराध ज्या ठिकाणी करण्यात आल्याचा आरोप असेल ते ठिकाण विनिर्दिष्ट करणारी नोटीस त्याच्यावर बजावण्यात आल्याशिवाय किंवा ती नोंदणीकृत डाकेने तिच्याकडे किंवा अपराध करण्यात आला असेल, त्या वेळी त्या वाहनाचा मालक म्हणून ज्या व्यक्तीची नोंदणी करण्यात आली असेल अशा व्यक्तीकडे पाठविण्यात आल्याशिवाय; किंवा
(c)ग) क) अपराध करण्यात आल्यापासून अठ्ठवीस दिवसांच्या आत अपराध करण्यात आल्याबद्दलचे समन्स तिच्यावर बजावण्यात आल्याशिवाय तिला सिद्धदोष ठरविण्यात येता कामा नये :
परंतु असे की-
(a)क)अ) या कलमामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली नोटीस किंवा समन्स बजावण्यात कसूर होण्याचे कारर म्हणजे आरोपी व्यक्तीचे किंवा वाहनाच्या नोंदणीकृत मालकाचे नाव व पत्ता वाजवी दक्षता घेऊनही वेळेत मिळविता आले नाही, किंवा-
(b)ख)ब) आरोपी व्यक्तीच्या वर्तणुकीमुळेच अशा प्रकारे बजावणी करता आली नाही;
याबाबत न्यायालयाचे समाधान झाले असले तर या कलमातील कोणतीही गोष्ट या बाबतीत प्रयुक्त असणार नाही.