मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०३ :
श्वासाच्या चाचण्या :
१.(१) कोणतीही व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवत असताना किंवा चालवण्याच्या प्रयत्नात असताना, कोणत्याही वर्दीधारी (गणवेशातील) पोलीस अधिकाऱ्याला किंवा मोटार वाहन विभागाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या, विभागातील प्राधिकाऱ्याला त्या व्यक्तीने कलम १८५ खाली अपराध केल्याचा संशय घेण्यास कोणतेही वाजवी कारण असेल तर असा अधिकारी, त्या व्यक्तीला उच्छवासाच्या चाचणीसाठी तेथल्या तेथे किंवा जवळपास त्याच्या उच्छवासाचे एक किंवा अधिक नमुने द्यावयास लावील :
परंतु, असा अपराध घडल्यानंतर, वाजवी रीत्या व्यवहार्य होईल तितक्या लवकर, उच्छवासाची चाचणी (ती करण्यात आली नसल्यास) करणे आवश्यक असेल.)
२) एखादे मोटार वाहन सार्वजनिक ठिकाणी अपघातात सापडले असेल आणि अपघाताच्या वेळी मोटार वाहन चालवत असलेल्या किंवा चालवण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीच्या रक्तात अल्कोहोल होते किंवा ती कलम १८५ मध्ये उल्लेखिलेल्या औषधिद्रव्याच्या नशेत वाहन चालवत होती असा संशय घेण्यास वर्दीतील पोलीस अधिकाऱ्याला कोणतेही रास्त कारण असल्यास तो अधिकारी मोटार वाहन अशा तèहेने चालवणाऱ्या व्यक्तीला पुढील ठिकाणी श्वासाच्या चाचणीसाठी तिच्या उच्छवासाचा नमुना देण्यास फर्मावू शकेल; ती ठिकाणे अशी:
(a)क) अ) ती व्यक्ती रूग्णालयातील आंतररूग्ण असल्यास त्या रूग्णालयामध्ये;
(b)ख) ब) इतर कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, जेथे असे फर्मावण्यात आले असेल, त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास, अथवा पोलीस अधिकाऱ्यास योग्य वाटल्यास तो पोलीस अधिकारी विनिर्दिष्ट करील अशा ठिकाणी :
परंतु, ती व्यक्ती रूग्णालयामध्ये आंतररूग्ण म्हणून दाखल झालेली असताना ती रूग्ण म्हणून प्रत्यक्षपणे ज्याच्या ताब्यात असेल त्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीला, त्या रूग्णाला नमूना देण्याबाबत फर्मावण्यात आल्याचे प्रथम कळवण्यात आलेले नसल्यास किंवा तो नमुना पुरवण्यामुळे किंवा पुरवण्यास फर्मावल्यामुळे रूग्णाची नीट देखभाल करण्याचा किंवा त्याच्यावर योग्य उपचार करण्याच्या कामावर प्रतिकूल परिणाम होईल या कारणावरून त्या वैद्यक व्यवसायीने, नमूना पुरवण्यास हरकत घेतल्यास त्या रूग्णाला असा नमुना देण्याबाबत फर्मावले जाणार नाही.
३) वर्दी घातलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) खाली कोणत्याही व्यक्तीच्या श्वासाची चाचणी घेतल्यानंतर जर त्याला असे आढळून आले की, ज्या साधनाच्या मदतीने चाचणी घेतली ते साधन त्या व्यक्तींच्या रक्तात वॉरंटाशिवाय अटक करू शकेल, परंतु ती व्यक्ती आंतररूग्ण म्हणून रूग्णालयात असल्यास तिचा अपवाद करण्यात येईल.
४) पोलीस अधिकाऱ्याने पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) खाली एखाद्या व्यक्तीला श्वासाच्या चाचणीसाठी तिच्या उच्छ्वासाचा नमुना देण्यास फर्मावले असता, तिने तसा नमुना देण्यास नकार दिला किंवा तो नमुना दिला नाही आणि तिच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे असा संशय पोलीस अधिकाऱ्याला रास्त कारणावरून वाटत असेल तर तो अपवाद सोडून एरवी तिला वॉरंटाशिवाय अटक करू शकेल.
५) या कलमाखाली अटक करण्यात आलेली व्यक्ती पोलीस ठाण्यावर असताना तिला तेथे श्वासाच्या चाचणीसाठी उच्छ्वासाचा नमुना देण्याची संधी देण्यात येईल.
६) या कलमाच्या तरतुदींनुसार केलेल्या श्वासाच्या चाचणीचा निष्कर्ष पुरावा म्हणून ग्राह्य असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, श्वासाची चाचणी याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे किंवा कसे हे समजण्यासाठी आणि त्या व्यक्तीने दिलेल्या उच्छवासाच्या किंवा अधिक नमुन्यांची केलेली चाचणी असा आहे. ही चाचणी केंद्र सरकारने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा चाचणीकरिता मान्यता दिलेल्या प्रकारच्या साधनाच्या मदतीने करण्यात येर्ईल.
——-
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ६१ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.