Mv act 1988 कलम २०१ : सुरळीत वाहतुकीत अडथळा निर्माण करण्याच्या कारणासाठी शास्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०१ :
सुरळीत वाहतुकीत अडथळा निर्माण करण्याच्या कारणासाठी शास्ती :
१) जो कोणी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, कोणतेही १.(***) वाहन, सुरळीत वाहतुकीस अडथळा होइल अशा रीतीने उभे करील तो, ते वाहन त्या स्थितीत जोपर्यंत राहील त्या वेळात २.(पाचशे रुपयापर्यंतच्या) शास्तीस पात्र ठरेल :
परंतु अपघात झालेली वाहने, कायद्याखालील निरीक्षण उपचारांची पूर्तता झाल्यानंतरच्या वेळेपासूनच फक्त शास्तीसाठी पात्र ठरतील :
३.(परंतु आणखी असे की, ते वाहन सरकारी एजन्सीद्वारे हलविण्यात आले असेल तेव्हा ते ४.(खेचून नेण्याचा खर्च) वाहनाच्या मालकाकडून किंंवा असे वाहन जिच्या ताब्यात असेल त्या व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल.)
५.(या कलमाखालील शास्ती किंंवा खेचून नेण्याचा खर्च राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्राधिकृत करु शकेल अशा अधिकाऱ्याकडून किंवा प्राधिकाऱ्याकडून वसूल करण्यात येईल.)
६.(३) ज्यावेळेस मोटार वाहन अनपेक्षितपणे बिघडले असेल आणि ते हलविण्याची प्रक्रिया चालू असेल तर पोटकलम (१) लागू होणार नाही.)
७.(स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी हलविण्याचा खर्च यामध्ये मोटार वाहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या खर्चाचा समावेश होतो, यामध्ये ओढून नेणे आणि असे मोटारवाहन ठेवण्याच्या खर्चाचासुद्धा समावेश होतो.)
————
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८७ अन्वये वगळण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ५९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ५९ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
७. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply