मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९९ :
कंपन्यांनी केलेले अपराध :
१) या कलमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केलेला असेल त्या बाबतीत अपराध घडला तेव्हा कंपनीचे कामकाज चालवण्याची जबाबदारी जिच्याकडे होती आणि त्या कामकाजासाठी जी कंपनीला जबाबदार होती ती प्रत्येक व्यक्ती त्याचप्रमाणे ती कंपनी उल्लंघन केल्याबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्याविरूद्ध कारवाई करून त्याप्रमाणे शिक्षा केली जाण्यास त्या पात्र असतील :
परंतु, तो अपराध अशा कोणत्याही व्यक्तीच्या नकळत घडला होता किंवा असा अपराध घडऊ नये म्हणून तिने योग्य ती सर्व दक्षता घेतली होती असे त्या व्यक्तीने सिद्ध केल्यास या पोट-कलमात काहीही असले तरी ती व्यक्ती या अधिनियमात नमूद केलेल्या कोणत्याही शिक्षेस पात्र ठरणार नाही.
२) पोट-कलम (१) मध्ये काहीही नमूद केलेले असले तरी, या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केलेले असेल आणि कंपनीच्या कोणत्याही संचालकाच्या, व्यवस्थापकाच्या, सेक्रेटरीच्या किंवा अन्य अधिकाऱ्यांच्या संमतीने किंवा त्याच्या मूक संमतीने अपराध करण्यात आला होता किंवा असा संचालक, इत्यादीने केलेल्या हलगर्जीपणाशी अशा अपराधांचा कारणसंबंध जोडता येण्यासारखा असेल, तर असा संचालक, व्यवस्थापक, सेक्रेटरी किंवा अन्य अधिकारी हादेखील त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि तो त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाण्यास व शिक्षा मिळण्यास पात्र असेल.
स्पष्टीकरण – या कलमाच्या प्रयोजनासाठी,
(a)क)अ) कंपनी याचा अर्थ, कोणताही निगमनिकाय (बॉडी कॉर्पोरेट) असा असून त्यामध्ये फर्मचा (व्यवसाय संस्थेचा) किंवा व्यक्तींच्या अन्य संघाचा समावेश होतो; आणि
(b)ख)ब) फर्मच्या संबंधात संचालक याचा अर्थ फर्ममधील भागीदार असा होतो.