Mv act 1988 कलम १९४ : परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९४ :
परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे :
१.(१) जो कोणी कलम ११३ किंवा कलम ११४ किंवा कलम ११५ च्या तरतुदींचे उल्लंघन करून मोटार वाहन चालवील किंवा मोटार वाहन चालवायला लावील किंवा चालवू देईल त्याला २.(***) ३.(वीस हजार रुपए द्रव्यदंड आणि अधिक असलेले वजन खाली उतरवण्याचा खर्च भरण्याच्या दायित्वासह अधिक वजनाच्या प्रत्येक टनामागे दोन हजार रुपये ) इतका जादा दंड भरण्याची शिक्षा होऊ शकेल :
४.(परंतु, अशा मोटार वाहनाच्या नियंत्रणात असलेल्या व्यक्तीद्वारे असे अतिरिक्त भार काढून टाकण्यापूर्वी किंवा काढून टाकण्यास परवानगी दिल्याजाण्यापूर्वी मोटार वाहन हलवण्यास परवानगी दिली जाणार नाही.))
५.(१अ) जो कोणी मोटार वाहन चालवतो किंवा कोणा करवी चालवतो किंवा चालवण्यास परवानगी देतो, तेव्हा मोटार वाहन अशा प्रकारे वजन भरले असेल की त्याचा भार किंवा त्याचा कोणताही भाग वाहनाच्या बॉडिच्या पलीकडे (अतिशय बाहेर) किंवा परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा पुढच्या बाजूस किंवा मागील बाजूस किंवा मर्यादेपेक्षा जास्त उंचीच्या बाहेर असल्यास तो वीस हजार रुपये इतक्या द्रव्यदंडास पात्र असेल व हा दंड अतिरिक्त भार काढून टाकण्याच्या खर्चा सहित असेल :
परंतु, अशा मोटार वाहनाला, त्याच्या परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा वाहनाच्या बॉडिच्या पलीकडे (अतिशय बाहेर) किंवा पुढच्या बाजूस किंवां मागील बाजूस किंवा मर्यादेपेक्षा जास्त उंचीच्या बाहेर भाराचा विस्तार होणार नाही अशाप्रकारे मर्यादेपर्यंत केल्याशिवाय हलविण्यास परवानगी दिली जाणार नाही :
परंतु आणखी असे की, जेव्हा अशा मोटर वाहनाला या संदर्भात राज सरकार किंवा केन्द्र सरकार द्वारा प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने विशिष्ट भार वाहून नेण्याची परवानगी दिली असेल तर या पोटकलमामधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.))
२) कलम ११४ खाली यासंबंधात अधिकार मिळालेल्या अधिकाऱ्याने वाहन थांबवण्यास व ते वजन करण्यासाठी नेण्यास सांगितले असता जो कोणी चालक तसे करणार नाही किंवा भरलेला माल किंवा त्याचा भाग वजन करण्यापूर्वी हलवील किंवा हलवायला लावील त्या चालकाला ६.(चाळीस हजार रुपये) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
———
१. १९९४ चा अधित्रनयम क्रमांक ५४ याच्या कलम ५७ अन्वये पोटकलम (१) ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७८ अन्वये कमीत कमी हे शब्द गाळण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७८ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७८ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७८ अन्वये पोटकलम (१) नंतर समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७८ अन्वये तीन हजार रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply