Mv act 1988 कलम १९४अ(क) : १.(जादा प्रवासी घेणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९४अ(क) :
१.(जादा प्रवासी घेणे :
जो कोणी, असे प्रवासी वाहन चालवित असेल किंवा इतर कोणाकडून चालवितो किंवा वाहन चालविण्यास संमती देतो आणि अशा प्रवासी वाहनामध्ये नोंदणी प्रमाणपत्रात किंवा वाहनाला लागू असेलेल्या परमिट मध्ये अधिकृत केल्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करील असेल तर तो प्रत्येक प्रवाशामागे दोनशे रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल :
परंतु, अशा प्रवासी वाहनातून अधिक प्रवासी उतरविल्याशिवाय आणि अशा प्रवाशांना पर्यायी वाहनाची सोय केल्याशिवाय वाहन चालविण्यास अनुमती दिली जाणार नाही.)
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply