Mv act 1988 कलम १९३ : योग्य प्राधिकाराविना काम करण्याऱ्या १.(एजटांना, प्रचार करणाऱ्यांना आणि जमा (गोळा) करणऱ्यांना) शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९३ :
योग्य प्राधिकाराविना काम करण्याऱ्या १.(एजटांना, प्रचार करणाऱ्यांना आणि जमा (गोळा) करणऱ्यांना) शिक्षा :
२.(१) जो कोणी, कलम ९३ च्या किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांच्या उपबंधांचे उल्लंघन करुन स्वत: एजंट किंवा प्रचारक म्हणून काम करील, तो पहिल्या अपराधाबद्दल ३.(एक हजार रुपये) इतक्या द्रव्यदंडास आणि कोणत्याही दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल सहा महिन्यांपर्यतं असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा ४.(दोन हजार रुपये) इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
५.(२) जो कोणी, कलम ९३ च्या किवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांच्या उपबंधांचे उल्लंघन करुन एक जमा करणारा (गोळा करणारा) म्हणून काम करील तो एक लाख रुपयांपर्यंत वाढविता येईल परंतु पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेसे पात्र होईल.
३) जो कोणी, एक जमा करणारा म्हणून काम करताना, कलम ९३ च्या पोटकलम (४) अन्वये दिलेल्या लायसनच्या अटींचे उल्लंघन करील, जो राज्य शासन द्वारा तात्विक अटींच्या स्वरुपात नेमलेला नसेल, तो पाच हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.)
————
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७७ अन्वये पोटकलम (१) म्हणून पुन:संख्यांकित केले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply