मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९२ब(ख) :
१.(नोंदणी संबंधित अपराध :
१) जो कोणी, मोटार वाहनचा मालक असताना, कलम ४१ च्या पोटकलम (१) अन्वये मोटार वाहनाच्या नोंदणीचा अर्ज सादर करण्यास असफल होता, तर तो मोटार वाहनाचा वार्षिक रोड करासाठी अर्ज करण्यास असफल होतो, तर तो वार्षिक रोड कराच्या पाचपटीत दंडाच्या शिक्षेस qकवा मोटार वाहनाच्या आजिवन कराच्या एक तृतीयांश कराऐवढ्या दंडाच्या शिक्षेस या दोन्ही पैकी जो जो जास्त असेल त्या शिक्षेस पात्र होईल.
२) जो कोणी, वितरक असताना, कलम ४१ च्या पोटकलमाच्या दुसऱ्या परंतुका अन्वये नवीन मोटार वाहनाच्या नोंदणीच्या अर्ज करण्यात असफल होतो तर तो मोटार वाहनाच्या वार्षिक रोड करच्या पंधरा पट किवा आजीवन कराच्या दंडाच्या या दोन्ही पैकी जो जास्त असेल त्या शिक्षेस पात्र होईल.
३) जो कोणी, मोटार वाहनाचा मालक असताना, अशा वाहनाच्या नोंदणीच्या प्रमाणपत्र कागदपत्रांच्या आधारे मिळवील जे चुकीचे असेल किवा कोणताही तपशिल चुकीचा असेल किंवा इंजिन क्रमांक व चासी क्रमांक नोंदणी प्रमाणपत्रात नोंद केलेला हे दोन्ही भिन्न असतील तर तो सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु एक वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि मोटार वाहनाच्या वार्षिक रोड कराच्या दहापट किंवा आजीवन कराच्या दोन तृतीयांश या पैकी जो जास्त असेल त्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.
४) जो कोणी, वितरक असताना, खोट्या अशा कागदपत्रांच्या आधारे अशा मोटारवाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र प्रतिरुपण द्वारा मिळविल जे खोटा आहे किंवा त्यावर जो इंजिन क्रमांक किंवा चासी क्रमांक हा नोंदणी प्रमाणपत्रा प्रमाणे भिन्न आहे तर तो सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु एक वर्षापर्यंत वाढविता येऊ शकेल इत्यक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि मोटार वाहनाच्या वार्षिक रोड कराच्या दहा पट किंवा आजीवन कराच्या दोन तृतीयांश जो जास्त असेल त्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.