Mv act 1988 कलम १९२अ (क) : १.(परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९२अ (क) :
१.(परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे :
१) १) जो कोणी कलम ६६, पोट-कलम (१) च्या तरतुदींचे उल्लंघन करून किंवा ते वाहन ज्या मार्गावर किंवा ज्या क्षेत्रात किंवा ज्या प्रयोजनासाठी वापरण्यात येणार असेल त्याच्याशी संबंधित असलेल्या परवान्यातील कोणत्याही शर्तींचे उल्ंलघन करून एखादे मोटार वाहन चालवील किंवा ते वापरण्यास कारणीभूत होईल किंवा तशी अनुज्ञा देईल त्याला पहिल्या अपराधासाठी २.(सहा महिन्यापर्यत असु शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि) ३.(दहा हजार रुपये) इतक्या दंडाची शिक्षा आणि नंतरच्या कोणत्याही अपराधासाठी एक वषापर्यंत वाढविता येईल परंतु ४.(सहा महिन्या) पेक्षा कमी नेसल अशी कारावासाची शिक्षा किंवा ५.(दहा हजार रुपये) अशा दंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
परंतु न्यायालयाला कारणे लेखी नमुद करून यापेक्षा कमी शिक्षा देऊ शकेल.
२) निकडीच्या प्रसंगी आजारी पडलेल्या किंवा इजा झालेल्या व्यक्तींना नेण्यासाठी किंवा आपत्तीच्या वेळी मदत करण्यासाठी अन्य किंवा सामग्री नेण्यासाठी किंवा दुरूस्तीची सामग्री वाहनू नेण्यासाठी किंवा तशाच प्रयोजनासाठी वैद्यकीय पुरवठ्याची सामग्री वाहून नेण्यासाठी मोटार वाहन वापरल्यास अशा वाहनाला या कलमातील कोणतीही गोष्ट लागू होत नाही.
परंतु वाहन वापरणाऱ्या व्यक्तीने त्या वापराबद्दल अशा वापराच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत प्रादेशिक परविहन प्राधिकरणाला कळवले पाहिजे.
३) पोटकलम (१) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या अपराधाबद्दल दोषी ठरवल्यास त्यावर ज्या न्यायालयाकडे अपील करता येते त्या न्यायालयाला खालच्या न्यायालयाने दिलेला कोणताही आदेश रद्द करता येईल किवा त्यात फेरबदल करता येईल मग ज्या दोषसिद्धीच्या संबंधात असा आदेश देण्यात आला होता तिच्याविरूद्ध अपील होऊ शकत नसले तरी हरकत नाही.)
——————
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ५६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७५ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७५ अन्वये तीन महीने याऐववजी समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ७५ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply