Mv act 1988 कलम १८२ : लायसनासंबंधीचे अपराध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८२ :
लायसनासंबंधीचे अपराध :
१) जो कोणी चालकाचे लायसन बाळगण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी या अधिनियमाखाली अपात्र ठरलेला असताना एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मोटार वाहन चालवील, किंवा चालकाच्या लायसनासाठी अर्ज करील किंवा ते मिळवील किंवा कोणताही शेरा नसलेले चालकाचे लायसन त्याला दिले जाण्यास तो हक्कदार नसताना, त्याने पुर्वी बाळगलेल्या चालकाच्या लायसनवर असलेला शेरा उघड न करता चालकाचे लायसन मिळण्यसाठी अर्ज करील किंवा ते मिळवील त्याला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किवा १.(दहा हजार रुपऐ) दंडाची किवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील आणि त्याने अशा रीतीने मिळविलेले चालकाचे कोणतेही लायसन मुळीच परिणामकारक असणार नाही.
२) वाहकाचे लायसन बाळगण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी या अधिनियमाखाली अपात्र ठरलेला असताना जो कोणी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी टप्पा वाहनाच्या लायसनासाठी अर्ज करील किंवा ते मिळवील किंवा कोणताही शेरा नसलेले वाहकाचे लायसन त्याला दिले जाण्यास तो हक्कदार नसताना त्याने पूर्वी बाळगलेल्या वाहकाच्या लायसनवर असलेला शेरा उघड न करता वाहकाच्या लायसनसाठी अर्ज करील किंवा ते मिळवील त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा २.(दहा हजार) पर्यंत आणि त्याने अशा रीतीने मिळविलेले वाहकाचे कोणतेही लायसन मुळीच परिणामकारक असणार नाही.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ६४ द्वारा (पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ६४ द्वारा (शंभर रुपऐ) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply