Mv act 1988 कलम १८२अ(क) : १.(मोटार वाहन आणि त्याच्या संघटक (कॉम्पोनन्टस्) यांची बाधणी, देखभाल, विक्री आणि बदलासंबंधित अपराधाकरिता शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८२अ(क) :
१.(मोटार वाहन आणि त्याच्या संघटक (कॉम्पोनन्टस्) यांची बाधणी, देखभाल, विक्री आणि बदलासंबंधित अपराधाकरिता शिक्षा :
१) जो कोणताही मोटार वाहन निर्माणकर्ता, आयातकर्ता किंवा वितरक, मोटार वाहनाची विक्री किवा वितरण किवा बदल करतो किंवा विक्री करण्याची किंवा वितरण करण्याची किवा बदल करण्याची तयारी दर्शवितो याबाबत प्रकरण सातमधील बनविलेल्या नियम व विनियमांचे उल्लंघन करतो तर एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास अशा प्रत्येक मोटार वाहनासाठी पात्र असेल :
परंतु कोणतीही व्यक्ती विक्रिच्या, वितरणाच्या किवा बदलाच्या वेळी किवा मोटार वाहनात बदल केला असेल व त्याबद्दल दुसऱ्या पक्षाला त्या बदलाबाबत उघड करुन स्पष्ट केले असेल की असा बदल प्रकरण सात व त्याखाली बनविलेल्या नियम व विनियमांच्या उपबंधाचे भंग करणारे आहे तर अशी व्यक्ती या कलमाखाली दोषी ठरणार नाही.
२) जो कोणी, मोटार वाहन निर्माणकर्ता असताना, प्रकरण सात किंवा त्याखाली बनविलेले नियम व विनियम यांचे अनुपालन करण्यास असफल झाला असेल तर एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा शंभर कोटी रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.
३) जो कोणी, केन्द्र शासनाने मोटार वाहनाचा नाजुक सुरक्षा संघटक (क्रिटिकल सेफ्टी कॉम्पोनन्टस) म्हणून अधिसूचीत केले असेल असा संघटक (कॉम्पोनन्टस्) विक्री करेल, किंवा विक्री करण्याची तयारी दर्शविल किंवा विक्री करण्यास अनुमती देईल, आणि अशाबाबतीत प्रकरण सात किंवा त्याअन्वये बनविलेले नियम व विनियम यांचे अनुपालन करत नाही तो एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावास किंवा असा प्रत्येक संघटकासाठी (कॉम्पोनन्टस्) एक लाख रुपये द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल.
४) जो कोणी, मोटार वाहनाचा मालक असाताना, या अधिनियम किंवा या अधिनियमान्वये बनविलेल्या नियम आणि विनियमांअन्वये परवानगी नसताना मोटार वाहनामध्ये रिट्रोफिटींग वाहनाच्या भागांमध्ये बदल करेल तो सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा प्रत्येक बदलासाठी पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इत्यक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ६५ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply