मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८० :
अनधिकृत व्यक्तींना वाहने चालविण्याची मुभा देणे :
मोटार वाहनाचा चालक असलेला किंवा ताबाधारक असलेला जो कोणी कलम ३ किंवा कलम ४ च्या तरतुदींची पूर्तता न करणाऱ्या अशा इतर कोणत्याही व्यक्तीला ते वाहन चालवायला लावील किंवा ते चालविण्याची परवानगी देईल त्याला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा १.(पाच हजार रूपयांपर्यंत) असू शकेल इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ६२ द्वारा (एक हजार रूपयांपर्यंत) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.