Mv act 1988 कलम १७ : चालकाचे लायसन नाकारणारे किंवा रद्द करणार आदेश व त्यांवरील अपील :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७ :
चालकाचे लायसन नाकारणारे किंवा रद्द करणार आदेश व त्यांवरील अपील :
१) लायसन देणारे प्राधिकरण कोणत्याही शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्याचे किंवा कोणत्याही चालकाचे लायसन देण्याचे किंवा त्याचे नवीकरण करण्याचे नाकारील किवा ते रद्द करील किंवा कोणत्याही चालकाच्या लायसनमध्ये वाहनाचे प्रकार किंवा वर्णने जादा दाखल करण्याचे नाकारील तर, त्याने अर्जदाराच्या किंवा यथास्थिति धारकाच्या नावाने आदेश काढून व त्यामध्ये अशा नाकारण्याची किंवा रद्द करण्याची कारणे लेखी कळवून तसे केले पाहिजे.
२) पोट-कलम (१) नुसार काढण्यात आलेल्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला तिच्यावर आदेश बजावण्यात आल्यापासून तीस दिवसांच्या आत विहित प्राधिकरणाकडे अपील करता येईल. ते प्राधिकरण, अशा व्यक्तीला आणि आदेश काढणाऱ्या प्राधिकरणाला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर अपीलाचा निर्णय करील आणि अपील प्राधिकरणाचा निर्णय, आदेश काढणाऱ्या प्राधिकरणावर बंधनकारक असेल.

Leave a Reply