मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७८ :
पास किंवा तिकिटाविना प्रवास करणे आणि वाहकाने आपल्या कामात हयगय करणे आणि करारावरील गाडी चालविण्याचे नाकारणे इत्यादींबद्दल दंड :
१) जो कोणी स्वत:जवळ योग्य तो पास किंवा तिकीट नसताना टप्पा वाहनातून प्रवास करील किंवा टप्पा वाहनामध्ये असताना किंवा त्यामधून उतरल्यावर त्याच्याकडे पासची किंवा तिकिटाची मागणी करण्यात आली असता ताबडतोब त्याचा पास किंवा तिकीट तपासणीसाठी दाखविण्याचे किंवा सुपूर्द करण्याचे नाकारील त्याला पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
स्पष्टीकरण – या कलमामधील पास , तिकीट या शब्दांना कलम १२४ मध्ये अनुक्रमे जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ या कलमातही असतील.
२) एखाद्या टप्पा वाहनाचा वाहक आणि एखाद्या टप्पा वाहनाचा चालक अशा टप्पा राहण्याच्या वाहकाची कामे पार पाडत असताना-
(a)क) अ) त्या टप्पा वाहनामधून प्रवास करत असलेल्या व्यक्तीने भाडे दिल्यानंतर तिल तिकीट देणे हे त्याचे कर्तव्य असेल आणि तो बुद्धिपुरस्पर किंवा हलगर्जीपणामुळे-
एक) भाडे देऊ करण्यात येईल तेव्हा ते घेणार नाही किंवा घेण्याचे नाकारील; किंवा
दोन) तिकीट देणार नाही आणि देण्याचे नाकारील; किंवा
तीन) चुकीचे तिकीट देईल; किंवा
चार) कमी किमतीचे तिकीट देईल, किंवा
(b)ख) ब) कोणताही पास किंवा तिकीट तपासणे हे त्याचे कर्तव्य असताना जाणुनबुजून किंवा हलगर्जीपणामुळे तसे करणार नाही किंवा तसे करण्याचे नाकारील, तर त्याला पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
३) एखाद्या परवानाधारक किंवा करारावरील गाडीचा चालक या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करून, करारावरील गाडी चालविण्यास किंवा उतारूंची ने-आण करण्यास नकार देईल तर त्याला-
(a)क)अ) दोन चाकी किंवा तीन चाकी मोटार वाहनांच्या बाबतीत पन्नास रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची; आणि
(b)ख)ब) इतर कोणत्याही बाबतीत १.(पाचशे रूपयांपर्यंत) असू शकेल, इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ६० द्वारा (दोनशे रूपयांपर्यंत) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.