मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७७अ(क) :
१.(कलम ११८ च्या अधीन विनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी कलम ११८ अन्वये बनविलेल्या विनियमांचे उल्लंघन केल्यास, पाचशे रुपयांपेक्षा कमी नाही परंतु एक हजार रुपयापर्यंत वाढविता येइल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.)
——–
१. २०१९ चा अधिनिय क्रमांक ३२ याच्या कलम ५९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.