मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १७० :
विवक्षित प्रकरणात विमा उतरविणाऱ्यास पक्षकार म्हणून सामील करून घेणे :
कोणत्याही चौकशीचे काम चालू असताना दावा न्यायाधिक-रणाची अशी खात्री पटली की-
(a)क)अ) मागणी करणारी व्यक्ती आणि जिच्याविरूद्ध मागणी करण्यात आली ती व्यक्ती यांच्यामध्ये संगनमत झालेले आहे; किंवा
(b)ख)ब) ज्या व्यक्तीविरूद्ध मागणी करण्यात आली त्या व्यक्तीने मागणीला विरोध केलेला नाही, तर लेखी नमूद करून ठेवावयाच्या कारणांवरून दावा न्यायाधिकरण असा निदेश देऊ शकेल की, अशा मागणीच्या संबंधात जबाबदार असणाऱ्या विमा उतरविणाऱ्यास संबंधित कार्यवाहीमध्ये एक पक्षकार म्हणून सामील करून घेण्यात यावे आणि अशा रीतीने सामील करून घेण्यात आलेल्या पक्षकाराला, त्यानंतर १.(कलम १५०), पोट-कलम (२) मध्ये असलेल्या तरतुदींना कोणतीही बाधा न पोहोचता, ज्या व्यक्तीविरूद्ध मागणी करण्यात आलेली असेल, त्याव्यक्तीला ज्याच्या आधार घेता येत असेल त्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही कारणांवरून त्या मागणीला विरोध करण्याचा हक्क असेल.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ कलम ५६ द्वारा (कलम १४९) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.