Mv act 1988 कलम १६९ : दावा न्यायाधिकरणाची कार्यपद्धती व अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६९ :
दावा न्यायाधिकरणाची कार्यपद्धती व अधिकार :
१) कलम १३८ खालील कोणत्याही चौकशीचे काम चालविताना दावा न्यायाधिकरणाला, या संबंधात करण्यात येतील अशा कोणत्याही नियमांच्या अधीन राहून, त्याला योग्य वाटेल अशा संक्षिप्त चौकशीचा अवलंब करता येईल.
२) शपथेवर साक्षीपुरावा घेणे, साक्षीदारांना उपस्थि राहण्यास भाग पाडणे आणि दस्तऐवज व महत्वाच्या वस्तू शोधून काढून त्या हजर करण्याची सक्ती करणे यासाठी ठरवून देण्यात येतील अशा इतर प्रयोजनांसाठी दिवाणी न्यायालयाला जे अधिकार असतात ते सर्व अधिकार दावा न्यायाधिकरणाला असतील, आणि दिवाणी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याचे कलम १९५ आणि प्रकरण सव्वीस यांच्या प्रयोजनासाठी दावा न्यायाधिकरण हे दिवाणी न्यायालय असल्याचे मानण्यात येईल.
३) या बाबत करण्यात येतील अशा कोणत्याही नियमांच्या अधीन राहून, दावा न्यायाधिकरणाला भरपाईच्या कोणत्याही मागणीबाबत निर्णय करण्यासाठी त्याला अशा चौकशीचे काम चालविण्यात मदत करण्याकरिता त्या चौकशीशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दलचे विशेष ज्ञान असणाऱ्या एका किंवा अधिक व्यक्तींची निवड करता येईल.
१.(४) निवाड्याच्या अंमलबजावणी करण्याच्या कारणासाठी, दावा न्यायाधिकरणाला, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ अन्वये दिवाणी न्यायालयाचे असलेले हुकूमनाम्याचे, जणू काही निवाडा हा हुकूमनामा असल्यासारखा दिवाणी दाव्यामधील रक्कम देण्याच्या बाबतीतील हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतील.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply