Mv act 1988 कलम १६४ : १.( मृत्यु किंवा गंभीर दुखापत प्रकरणात भरपाई देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६४ :
१.( मृत्यु किंवा गंभीर दुखापत प्रकरणात भरपाई देणे :
१) या अधिनियमामध्ये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये किंवा कायद्याचा प्रभाव असणाऱ्या कोणत्याही विलेखांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, मोटार वाहनाचा उपयोग केल्यामुळे झालेल्या अपघातात कोणाचा मृत्यु होईल किवा गंभीर दुखापत होईल तर मोटार वाहनाचा मालक किंवा प्राधिकृत विमाकार प्रकरणपरत्वे कायदेशीर वारसांना, मृत्यु झाल्यास पाच लाख रुपये किंवा गंभीर दुखापत झाल्यास दोन लाख पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात पात्र असेल.
२) पोटकलम (१) खालील भरपाई मिळण्यासाठी केलेल्या कोणत्याही हक्कमागणीत हक्क मागणीदाराला, ज्यासंबंधात हक्कमागणी करण्यात आलेली असेल तो मृत्यु किंवा कायमची विकलांगता, ही संबंधित वाहनाच्या किंवा वाहनांच्या मालकाच्या किवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या दोषपूर्ण कृतीमुळे किंवा हयगयीमुळे किवा चुकीमुळे ओढवलेली आहे, असा युक्तिवाद करण्याची किवा असे शाबीत करण्याची आवश्यकता असणार नाही.
३) जिथे, मोटार वाहनाचा उपयोग केल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यु किंवा कायमची विकलांगता आली असेल अशा बाबतीत त्या त्यावेळी अंमलात असेलेल्या कोणत्याही अधिनियमान्वये नुकसान भरपाईची रक्कम दिलेली असेल तर या कलमान्वये भरपाईच्या रक्कमेतून कमी केली जाईल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply