मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६४क(ग) :
१.(केन्द्र शासनाची नियम करण्याची शक्ती :
१) केन्द्र शासन या प्रकरणाच्या उपबंधाची अंमलबजावी करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल.
२) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेला हानी न पोचवता, अशा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील :-
(a)क) अ) या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी उपयोगात आणावयाचे नमुने-
एक) कलम १४७ च्या पोटकलम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विमा पॉलिसीचा तपशील असलेला नमुना;
दोन) कलम १५७ च्या पोटकलम (२) अन्वये विमा प्रमाणपत्रामध्ये वर्णन केलेले तथ्य संबंधात प्रमाणापत्राच्या हस्तांतरणाचा नमुना;
तीन) कलम १५९ च्या पोटकलम (१) अन्वये अपघाताच्या माहितीचा अहवाल तयार करणे व तो अहवाल दावा न्यायाधिकरण किंवा अन्य एजन्सीकडे सादर करण्याची रीत व कालावधी यांचा नमुना;
चार) कलम १६० अन्वये सूचना सादर करण्याचचा नमुना; आणि
पाच) कलम १६४ब च्या पोटकलम (७) अन्वये मोटार वाहन अपघात निधीसाठी हिशोबाच्या वार्षिक विवरणाचा नमुना;
(b)ख)ब) विमा प्रमाणपत्रांकरता अर्ज करणे व ते देणे;
(c)ग) क) गहाळ झालेली, नष्ट झालेली किंवा जीर्ण झालेली अशी जी विमा प्रमाणपत्रे असतील त्यांच्याऐवजी त्यांच्या दुसऱ्या प्रती देणे;
(d)घ) ड) विमा प्रमाणपत्रे सांभाळून ठेवणे, ती सादर करणे, रद्द करणे व स्वाधीन करणे;
(e)ङ)ई) या प्रकरणाखाली दिलेल्या विमापत्रांबाबत विमाकारांनी नोंदी ठेवणे;
(f)च) फ) या प्रकरणाच्या उपबंधापासून सूट मिळालेल्या व्यक्तींची किंवा वाहनांची प्रमाणपत्रांवरुन किंवा अन्यता ओळख पटवणे;
(g)छ)ग) विमाकारांनी विमापत्रांसंबंधातील माहिती पुरविणे;
(h)ज) ह) भारतात केवळ तात्पुरते वास्तव्य करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी भारतात आणलेल्या वाहनांना किंवा एखाद्या देवाण घेवाण करणाऱ्या देशात नोंदणी केलेल्या व भारतातील कोणत्याही नियत मार्गावर किवा कोणत्याही क्षेत्रात चालवण्यात येणाऱ्या वाहनांना या प्रकरणाचे उपबंध अनुकूल करणे;
(i)झ) आय) कलम १४५ च्या खंड (ब) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे विमा प्रमाणपत्रातील जरुरीच्या बाबींची पूर्तता करणे;
(j)ञ)जे) कलम १४६ च्या पोटकलम (७) अन्वये स्थापन केलेल्या निधीचे व्यवस्थापन;
(k)ट) के) कलम १४७ च्या पोटकलम (२) विमाकर्ताची अधिकतम जबाबदारी आणि कमीत कमी प्रिमियम;
(l)ठ) एल) कलम १४७ च्या पोटकलम (३) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे विमा पॉलिसी देण्याच्या अटी यांना अधीन राहून ते देणे आणि इतर बाबी;
(m)ड) एम) कलम १४९ च्या पोटकलम (२) अन्वये तडजोडीचा तपशील, अशा तडजोडीचा कालमर्यादा आणि त्याची पद्धत;
(n)ढ) एन) कलम १५८ च्या पोटकलम (३) च्या परंतुका अन्वये असलेल्या सवलती आणि बदल यांचा विस्तार;
(o)ण) ओ) कलम १५८ च्या पोटकलम (५) अन्वये इतर पुरावा;
(p)त) पी) कलम १५९ अन्वये अशा इतर एजन्सीकडे अपघातासंबंधी अहवाल सादर करणे;
(q)थ) क्यू) कलम १६० अन्वये माहिती सादर करण्याची कालमर्यादा आणि शुल्क;
(r)द) आर) कलम १६१ च्या पोटकलम (२) च्या खंड (अ) अन्वये मृत्यू संबंधात भरपाईची जास्तीत जास्त रक्कम;
(s)ध) एस) कलम १६१ च्या पोटकलम (४) च्या खंड (अ) मध्ये निर्दिष्ट केलेली अंतरिम मदतीची दिली जाणारी रक्कम;
(t)न) टी) कलम १६४ च्या पोटकलम (१) अन्वये भरपाई देण्याची पद्धत;
(u)प) यू) कलम १६४अ च्या पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट योजने साठी निधी वसूल करण्यासाठी इतर अन्य स्त्रोत;
(v)फ)व्ही) कलम १६४ब च्या पोटकलम (१) अन्वये मोटार वाहन अपघात निधीमध्ये उत्पन्न जमा करण्यासाठी इतर अन्य स्त्रोत;
(w)ब) डब्ल्यू) कलम १६४ब च्या पोटकलम (३) च्या खंड (ड) अन्वये कोणत्या व्यक्तीला भरपाई द्यावयाची;
(x)भ) एक्स) कलम १६४ब च्या पोटकलम (४) अन्वये जास्तीत जास्त दायित्व रक्कम;
(y)म) वाय) कलम १६४ब च्या पोटकलम (६) च्या खंड (क) अन्वये इतर मानदंड;
(z)य) झेड) विहित करावयाची असेल किंवा करता येईल किंवा ज्याच्या संबंधात नियमांद्वारे उपबंध करता येण्यासारख्या इतर बाबी;)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.