Mv act 1988 कलम १६३ : १.( कलम १६१ खाली देण्यात आलेल्या भरपाईचा काही विवक्षित प्रकरणात परतावा :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६३ :
१.( कलम १६१ खाली देण्यात आलेल्या भरपाईचा काही विवक्षित प्रकरणात परतावा :
१) कलम १६१ खालील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू किंवा जबर दुखापत याच्या संबंधातील भरपाईच्या रकमेचे प्रदान है, या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही उपबंधाखाली किंवा अन्य कोणत्याही कायद्याखाली असा मृत्यू किंवा जबर दुखापत याबाबत भरपाईच्या मागणीच्या पूर्तीऐवजी किंवा त्या रुपाने प्रदान करण्यात आली असेल किंवा चुकती करण्यात आली असेल अशी कोणतीही भरपाई (या पोटकलमात यापुढे जिचा निर्देश अन्य भरपाई असा करण्यात आला आहे) किंवा इतर रक्कम किंवा अन्यथा कलम १६१ खाली दिलेल्या भरपाईच्या रकमेइतकी आहे अशी उक्त इतर भरपाई किंंवा इतर रक्कम, विमादाराला परत करण्यात येईल या अटीच्या अधीनतेने करण्यात येईल.
२) या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधाखाली (कलम १६१ शिवाय) किंवा इतर कोणत्याही कायद्याखाली एका मोटार वाहनाच्या किंवा अनेक मोटार वाहनांच्या उपयोगामुळे झालेला कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू किंवा शारीरिक इजा यांचा समावेश असणाऱ्या अपघाताच्या संबंधातील भरपाई प्रदान करण्यापूर्वी न्यायाधिकरण, न्यायालय किंवा इतर प्राधिकरण, अशी भरपाई देताना, कलम १६१ खाली असा मृत्यू किंवा शारीरिक इजा यांच्या संबंधात अगोदरच भरपाई देण्यात आली आहे किंवा नाही याची पडताळणी करील किंवा त्या कलमाखाली भरपाई देण्याचा अर्ज प्रलंबित असेल आणि असे न्यायाधिकरण, न्यायालय किंवा इतर प्राधिकरण हे,-
(a)क) अ) जर कलम १६१ खाली अगोदरच भरपाई देण्यात आली असेल तर, न्यायाधिकरण, न्यायालय किंवा इतर प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आलेली भरपाई चुकती करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तीला पोटकलम (१) च्या उपबंधानुसार परत करणे आवश्यक असेल इतकी रक्कम विमादाराला परत करण्याबाबत निदेश देईल;
(b)ख) ब) जर कलम १६१ खाली भरपाईच्या रकमेसाठी अर्ज प्रलंबित असेल तर, त्यांच्याकडून देण्यात आलेल्या भरपाईचा तपशील विमादाराकडे अग्रेषित करतील.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ कलम १६१ खालील भरपाईचा अर्ज पुढील बाबींच्या संबंधात प्रलंबित असल्याचे समजण्यात येईल :-
एक) जर असा अर्ज नाकारण्यात आला असेल तर, अर्ज नाकारण्यात आल्याच्या तारखेपर्यंत ; आणि
दोन) अन्य कोणत्याही प्रकरणात अर्जास अनुसरुन भरपाईच्या रकमेच्या प्रदानाच्या तारखेपर्यंत.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply