मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५८ :
१.(प्रमाणपत्रे, लायसन आणि विवक्षित प्रकरणांमध्ये परवाना सादर करणे :
१) कोणत्याही सार्वजनिक स्थळी मोटार वाहन चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, राज्य शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या वर्दीधारी पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास वाहनाच्या वापराशी संबंधित, –
(a)क)अ) विमाप्रमाणपत्र;
(b)ख)ब) नोंदणी प्रमाणपत्र;
(c)ग) क) प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र;
(d)घ) ड) चालन लायसन;
(e)ङ)ई) परिवहन वाहनाच्या बाबतीत, कलम ५६ मध्ये निर्देशिलेले स्वास्थ्य प्रमाणपत्र आणि परवाना; आणि
(f)च) फ) या अधिनियमाखाली दिलेले कोणतेही प्रमाणपत्र किंवा सवलतीबाबतचे प्राधिकारपत्र,
सादर करावा लागेल.
२) मोटार वाहन एखाद्या सार्वजनिक स्थळी असताना अपघात होऊन त्यामुळे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला अथवा त्यास शारीरिक इजा पोहोचली असता त्यावेळी वाहनाच्या चालकाने पोलीस अधिकाऱ्याला पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेले विमाप्रमाणपत्र, चालन लायसन आणि परवाना सादर केला नाही तर, कलम १३४ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तो ज्या पोलीस ठाण्यावर खबर देईल तेथे त्याला उपरोक्त विमाप्रमाणपत्र, लायसन आणि परवाना सादर करावा लागेल.
३) पोटकलम (१) खाली ज्या दिनांकास विमाप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते त्या दिनांकापासून किंवा प्रकरणपरत्वे, अपघात घडून आल्याच्या दिनांकापासून सात एखाद्या व्यक्तीने जर ते सादर करण्याची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यावर किंवा, प्रकरणपरत्वे, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा जेथे तिने अपघाताची खबर दिली त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला ते प्रमाणपत्र सादर केले तर, विमाप्रमाणपत्र देण्यास चुकल्याच्या कारणास्तव अशी कोणीही व्यक्ती पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) खली दोषसिद्धीस पात्र अ्रसणार नाही :
परंतु, विहित करण्यात येईल अशी व्याप्तीखेरीज करुन व तशा आपरिवर्तनाखेरीज, या पोटकलमाचे उपबंध परिवाहनाच्या चालकाला लागू होणार नाहीत.
४) मोटार वाहन कलम १४६ चे व्यतिक्रमण करुन चालवले जात होते किंवा नव्हते हे ठरविण्याच्या प्रयोजनासाठी, राज्य शासनाने यासंबंधात शक्तीप्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून किंवा त्याच्यावतीने मोटार वाहनाच्या मालकाला माहिती देण्यास फर्माविण्यात येईल तेव्हा व चालकाला या कलमाखाली आपले विमाप्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात येईल अशा कोणत्याही प्रसंगी त्याला अशी माहिती द्यावी लागेल.
५) या कलमात, आपले विमाप्रमाणपत्र सादर करणे या शब्दप्रयोगाचा अर्थ, विमाप्रमाणपत्र किंवा कलम १४६ चे व्यतिक्रमणट करुन वाहन चालवण्यात येत नव्हते हे शाबित करण्यासाठी विहित करण्यात येईला असा अन्य पुरावा तपासणीसाठी सादर करणे, असा आहे.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.