Mv act 1988 कलम १५६ : १.(विमा प्रमाणपत्राचा परिणाम :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५६ :
१.(विमा प्रमाणपत्राचा परिणाम :
जेव्हा विमाकार व विमेदार यांच्यामधील विमा संविदेच्या संबंधात विमाकाराने विमा प्रमाणपत्र दिले असेल तेव्हा,-
(a)क)अ) विमाकाराने विमेदाराला प्रमाणपत्रात वर्णिलेले विमापत्र दिले नसेल तर व तोपर्यंत खुद्द विमाकार व विमेदाराखेरीज अन्य कोणतीही व्यक्ती यांच्यामधील संबंधापुरते, अशा प्रमाणपत्रात नमूद केलेल्या वर्णणाशी व तपशीलाशी सर्वथा जुळणारे असे विमापत्र विमाकाराने विमेदार व्यक्तीला दिले असल्ययाचे मानण्यात येईल, आणि
(b)ख)ब) जर विमाकाराने विमेदाराला प्रमाणपत्रात वर्णिलेले विमापत्र दिले असेल, पण विमापत्राखाली किंवा त्याच्या आधारे विमाकाराविरुद्ध प्रत्यक्षपणे किंवा विमेदारामार्फत हक्क सांगणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीने विमापत्राच्या प्रत्यक्षातील अटी प्रमाणपत्रात विमापत्राचा जो तपशील नमूद असेल त्याच्यापेक्षा कमी अनुकूल असतील तर विमाकार व विमेदाराखेरीज अन्य कोणतीही व्यक्ती यांच्यामधील संबंधापुरते त्या विमापत्राच्या अटी उक्त प्रमाणपत्रात नमूद केलेल्या तपशीलाशी सर्वथा जुळणाऱ्या असल्याचे मानले जाईल.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply