Mv act 1988 कलम १५१ : १. (विमेदार दिवाळेखोर झाला असताना त्रयस्थपक्षांना विमाकारांविरुद्ध असलेले अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५१ :
१. (विमेदार दिवाळेखोर झाला असताना त्रयस्थपक्षांना विमाकारांविरुद्ध असलेले अधिकार :
१) या प्रकारणाच्या उपबंधानुसार केलेल्या कोणत्याही विमासंविदेखाली एखाद्या व्यक्तीचा त्रयस्थ पक्षाप्रत तिच्यावर जी दायित्वे येतील अशा दायित्वांबद्दल विमा उतरवण्यास आला असेल तेव्हा, –
(a)क) अ) ती व्यक्ती दिवाळखोर झाली अथवा तिने आपल्या धनकोबरोबर आपसाती किंवा व्यवस्था केली असता, किंवा
(b)ख) ब) विमेदार व्यक्ती ही कंपनी असेल त्या बाबतीत, कंपनीच्या संबंधात परिसमापनाचा आदेश देण्यात आला असताना किंवा स्वेच्छापूर्वक परिसमापन करण्याचा ठराव संमत करण्यात आला असताना अथवा कंपनीचा व्यवसाय किंवा उप्रकमासाठी प्रापक (रिसीव्हर) किंवा व्यवस्थापक रीतसर नियुक्त करण्यात आला असताना, अथवा त्या प्रभावाद्वारे प्रतिभूत केलेल्या कोणत्याही ऋृणपत्राच्या धारकांनी किंवा त्यांच्या वतीने प्रभारांमध्ये समाविष्ट किंंवा त्यास अधीन असलेल्या कोणत्याही मालमत्तेचा कब्जा घेतला असताना,
जर अशा प्रसंगापूर्वी किंवा त्यांनतर विमेदार व्यक्तीवर असे कोणतेही दायित्व आले असेल तर, त्या दायित्वासंबंधी संविदेखाली तिला विमाकाराविरुद्ध असलेले अधिकार, अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधात काहीही विरुद्ध असले तरी, ज्याच्यासंबंधी याप्रमाणे दायित्व आले अशा त्रयस्थ पक्षांकडे हस्तांतरित होऊन त्याच्यामध्ये निहित होतील.
२) एखाद्या मृत ऋृणकोच्या संपदेच्या प्रशासनाचा आदेश दिवाळखोरी कायद्यानुसार देण्यात आला असेल त्याबाबतीत, त्रसस्थ पक्षासंबंधी यावयाच्या ज्या दायित्वांबद्दल या प्रकरणाच्या उपबंधानुसार विमा संविदेखाली त्याच ऋृणकोचा विमा उतरवलेला होता, अशा दायित्वाबाबत मृत व्यक्ती ही दिवाळखोरी कार्यवाहीत शाबीत होण्यासारखे असे कोणतेही ऋृण देणे लागत असेल तर, त्या दायित्वाबाबत मृत ऋृणकोला विमाकाराविरुद्ध असलेले अधिकार, कायद्याच्या कोणत्याही उपबंधामध्ये काहीही विरुद्ध असले तरी, ज्याला ते ऋृण देणे आहे अशा पक्षाकडे हस्तांतरित होऊन त्याच्यामध्ये निहित होतील.
३) पोटकलम (१) चा खंड (अ) किंवा खंड (ब) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्यापैकी कोणतीही घटना किंवा दिवाळखोरी कायद्यानुसार मृत ऋृणकोच्या संपदेचे प्रशासन करण्यासाठी आदेश देण्यात आल्यास प्रत्यक्षपरे किंवा अप्रत्यक्षपणे विमापत्र शून्य करण्याचे किंवा पक्षांना त्याखाली असलेल्या अधिकारंमध्ये फेरबदल करण्याचे या प्रकरणाखाली देण्यात आलेल्या विमापत्रातील ज्या शर्तींमध्ये अभिप्रेत असेल अशी कोणतीही शर्त परिणामक असणार नाही.
४) पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) खाली हस्तांतरण झाल्यावर, विमाकाराचे विमेदार व्यक्तीप्रत जे दायित्व राहिले असते तेच दायित्व त्रयस्थ पक्षाप्रत राहील, पण –
(a)क) अ) जर विमाकाराचे विमेदार व्यक्तीप्रत असलेले दायित्व हे विमेदार व्यक्तीवर त्रयस्थ पक्षाप्रत असलेल्या दायित्वाहून अधिक असेल तर, अतिरिक्त दायित्वाबाबत विमाकराविरुद्ध विमेदार व्यक्तीस असलेल्या अधिकारांवर या प्रकरणातील कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होणार नाही, आणि
(b)ख) ब) जर विमाकाराचे विमेदार व्यक्तीप्रत असेलेले दायित्व हे विमेदार व्यक्तीवर त्रयस्त्र पक्षाप्रत असलेल्या दायित्वाहून कमी असेल तर, शेष दायित्वाबाबत विमेदार व्यक्तीविरुद्ध, त्रयस्थ पक्षास असलेल्या अधिकारांवर या प्रकरणातील कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होणार नाही.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply