Mv act 1988 कलम १४ : मोटार वाहन चालकाचे लायसन चालू राहण्याचा कालावधी :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १४ :
मोटार वाहन चालकाचे लायसन चालू राहण्याचा कालावधी :
१) या अधिनियमान्वये देण्यात आलेले शिकाऊ व्यक्तीचे लायसन ते देण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत परिणामकारक असेल.
२) या अधिनियमान्वये देण्यात आलेले किंवा नवीकरण करण्यात आलेले लायसन-
(a)क) अ) परिवहन वाहन चालविण्याचे लायसन असेल अशा बाबतीत १.(पाच वर्षाच्या) कलावधीसाठी परिणामकारक राहील; २.(***)
३.(परंतु, घातक किंवा धोकादायक स्वरूपाच्या वस्तू वाहून नेणारे परिवहन वाहन चालविण्याचे लायसन ४.(तीन वर्षासाठी परिणामकारक राहील आणि त्याचे नवीकरण केंद्र सरकार विहित करील अशा शर्तींना अधीन असेल आणी) त्याचे नवीकरण त्या वाहनाचा चालक विहित अभ्यासक्रमातील एक दिवसाचा उजळणी पाठ्यक्रम पूर्ण करील या शर्तींच्या अधीनतेने करण्यात येईल, आणि
(b)(ख) ५.(ब) इतर कोणत्याही लायसनच्या बाबतीत, केंद्र सरकार विहित करील अशा अटींना अधीन राहून, जर लायसन प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने मूल रुपात किंवा त्याच्या नुतनीकरणावेळी,-
एक) अशा लायसनच्या जारी करण्याच्या वेळी किंवा त्याच्या नुतनीकरणाच्या तारखेला वयाची तीस वर्षे पुर्ण करीत नाही तर लायसन त्या व्यक्तिच्या वयाची ४० वर्षे पुर्ण होईपर्यंतच्या तारखेस परिणामकारक राहील; किंवा
दोन) अशा लायसनच्या जारी करण्याच्या वेळी किंवा त्याच्या नुतनीकरणाच्या तारखेला वयाची तीस वर्षे पुर्ण करील परंतु वयाची पन्नास वर्षे पुर्ण केलेली नाही तर लायसन त्या तारखेपासून दहा वर्षांच्या अवधी पर्यंत परिणामकारक असेल; किंवा
तीन) अशा लायसनच्या जारी करण्याच्या वेळी किंवा त्याच्या नुतनीकरणाच्या तारखेला वयाची पन्नास वर्षे पुर्ण करील परंतु वयाची पंच्चावन्न वर्षे पुर्ण केलेली नाही तर लायसन त्या त्या व्यक्तिच्या वयाची ६० वर्षे पुर्ण होईपर्यंतच्या तारखेस परिणामकारक राहील; किंवा
चार) त्याने, यथास्थिति, अशा लायसनच्या जारी करण्याच्यावेळी किंवा त्याच्या नुतनीकरणाच्या तारखेला वयाची पंच्चावन्न वर्षे पुर्ण करील तर लायसन जारी करण्याच्या किंवा नुतनीकरणाच्या तारखेपासून पाच वर्षांच्या अवधि पर्यंत परिणामकारक राहील.)
६.(***)
———–
१. २०१९ चा अधिनियम सं. ३२ चा कलम ९ द्वारा तीन वर्ष शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२.१९९४ चा अधिनियम सं. ५४ चा कलम ९ द्वारा (१४-११-१९९४ पासून ) वगळण्यात आले.
३.१९९४ के अधिनियम सं. ५४ चा कलम ९ द्वारा (१४-११-१९९४ पासून ) समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम सं. ३२ चा कलम ९ द्वारा विवक्षित शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम सं. ३२ चा कलम ९ द्वारा खंड ब ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियम सं. ३२ चा कलम ९ द्वारा परंतुक वगळण्यात आले.

Leave a Reply