मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १४८ :
१.(देवाण-घेवाण करणाऱ्या देशांमध्ये दिलेल्या विमापत्रांची विधिग्राह्यता :
भारत आणि कोणताही देवाण-घेवाण करणारा देश यांच्यामधील व्यवस्थेला अनुसरुन जेव्हा देवाण-घेवार करणाऱ्या देशात नोंदणी झालेले कोणतेही मोटार वाहन दोन्ही देशांना सामाईक असलेल्या कोणत्याही मार्गावर अथवा अशा कोणत्याही क्षेत्रात चालवण्यात येत असेल आणि देवाण-घेवाण करणाऱ्या देशामध्ये त्या वाहनाचा उपयोग करण्याच्याबाबत त्या देशात अंमलात असलेल्या विमाविषयक कायद्याच्या आवश्यकता पूर्ण करणारे विमापत्र अंमलात असेल तर, मग कलम १४७ मध्ये काहीही असले तरी, पण कलम १६४ब खाली करण्यात येतील अशा नियमांच्या अधीनतेने, असे विमापत्र हे जणूकाही या प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार असावे त्याप्रमाणे ते ज्या नियतमार्गाच्या किंवा क्षेत्राच्या संबंधात व्यवस्था करण्यात आली असेल तेथे सर्वत्र परिणामक होईल.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.