Mv act 1988 कलम १३८ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३८ :
राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
१) कलम १३७ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बाबी वगळून या प्रकरणातील अन्य बाबींसाठीच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील.
(१क)१.(१अ) राज्य सरकार, रस्ता सुरक्षेच्या हितासाठी, गैर-यांत्रिकरित्या चालणारी वाहने आणि सार्वजनिक ठिकारी आणि राष्ट्रीय राजमार्गावर पादचाऱ्यांचा रस्ता वापर यांचे विनियमन करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल :
परंतु राष्ट्रीय राजमार्गाच्या बाबतीत नियम बनविताना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाशी विचारविनिमय करेल.)
२) पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेला बाध न येता या नियमांद्वारे पुढील गोष्टींसाठी तरतुदी करण्यात आलेली असेल –
(a)क)अ) मोडतोड झालेले किंवा उभे करून ठेवण्यात आलेले किंवा रस्त्यावर सोडून देण्यात आलेले वाहन तेथून हलविणे आणि त्याच्यामधील भारासह (मालासह) त्याचा सुरक्षित ताबा;
(b)ख)ब) वजन करण्याचे मशिन बसविणे आणि त्याचा वापर;
(c)ग) क) महामार्गांच्या कडेला असलेल्या सुविधा संकुलांची देखभाल आणि व्यवस्थापन;
(d)घ) ड) अग्निामन दलाची वाहने, रूग्णवाहिका आणि वाहनांचे इतर वर्ग आणि वर्णने यांना विहित करण्यात येतील, अशा शर्तींच्या अधीनतेने या प्रकरणाच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदींमधून सूट देणे;
(e)ङ)ई) वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहनतळ यांची देखभाल, व्यवस्थापन आणि त्यांच्या वापरासाठी फी कोणतीही असेल तर;
(f)च) फ) एखादे मोटार वाहन, त्याचा गिअर निरूपयोगी झाला असताना कोणत्याही उतारावरून एकतर सर्वसाधारणपणे किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट ठिकाणी चालवून नेण्यास प्रतिबंध करणे;
(g)छ)ग) चालत्या वाहनावर ताबा मिळविण्यास किंवा त्यामध्ये चढण्यास प्रतिबंध करणे;
(h)ज)ह) मोटार वाहनांनी पदपथाला किंवा फरसबंदीचा वापर करण्यास प्रतिबंध करणे;
(i)झ)आय) सर्वसाधारणपणे जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला धोका, इजा किंवा उपद्रव पोहोचविण्यास किंवा मालमत्तेला धोका किंवा इजा पोहोचविण्यास किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यास प्रतिबंध करणे; आणि
(j)ञ)जे) विहित करावयाची किंवा विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब.
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply