Mv act 1988 कलम १३७ : केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३७ :
केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
केंद्र शासनाला पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तरतूद करण्यासाठी नियम करता येतील –
(a)क) अ) मोटार वाहनाच्या चालकांना जेव्हा सिग्नल देता येतील असे प्रसंग आणि कलम १२१ खालील असे सिग्नल;
(aa)कक) १.(अअ) कलम १२९ अन्वये शिरोवेष्टन (हेल्मेट) च्या मानके व चार वर्षाखालील बालकाच्या सुरक्षितता उपायांसाठी उपबंध करणे;)
(b)ख) ब) कलम १३० नुसार पोलीस अधिकाऱ्यांना लायसने व दस्तऐवज ज्या रीतीने सादर करावयाचे ती रीत.
(c)ग) २.(क) राज्य शासन द्वारा कलम १३६अ च्या पोटकलम (१) अन्वये शहरांच्या सीमांकरीता उपबंध करणे; आणि
(d)घ) ड) कलम १३६अ च्या पोटकलम (२) अन्वये इलैक्ट्रॉनिक मॉनिटरी (देखरेख) आणी अंमलबजावरी करीता उपबंध करणे;)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४८ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४८ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply