मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३६अ(क) :
१.(रस्त्यावरील सुरक्षितता याची अंमलबजावणी आणि इलैक्ट्रॉनिक मॉनिटरी (देखरेख) :
१) राज्य शासन, राष्ट्रीय राज्यमार्ग, राज्य राज्यमार्ग, राज्यतील अंतर्गत रस्ते किंवा अशा शहरी नगरामध्ये ज्यांची जनसंख्या सिमेंपर्ययत आहे, जी केन्द्र शासन द्वारा विहित केली जाईल, अशा रस्त्यावर पोटकलम (२) अन्वये उपबंधित पद्धतीने रस्त्याची सुरक्षेची इलेक्ट्रॉनिक मॉनिटरी (देखरेख) आणी अंमलबजावणी सुनिश्चित करील.
२) केन्द्र शासन, रस्त्याची सुरक्षितता याची अंमलबजावणी आणी इलेक्ट्रॉनिक मॉनिटरीसाठी नियम बनवेल, ज्याच्या अंतर्गत, स्पीड कॅमेरा (गति मापक कॅमेरा), क्लोज्ड सर्किट टेलीविजन कॅमेरा, स्पीड गन (गति मापक गन), शरीराला बांधता येणारे कॅमेरा आणि इतर टेक्नॉलॉजी.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, शरीरावर बांधला जाणारा कॅमेरा (बॉडी वेअर कॅमेरा) म्हणजे मोबाईल ऑडियो व व्हिडियो रेकॉर्ड करणारे डिवाईस जे राज्य शासन द्वारा प्राधिकृत केले जाईल अशा व्यक्तीच्या शरीरावर किंवा गणवेशावर (युनिफॉमवर) बांधला जाईल.)
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.