मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३४अ(क) :
१.( चांगल्या (परोपकारी) व्यक्तीचे संरक्षण :
१) कोणताही चांगला (परोपकारी) व्यक्ती, मोटार वाहनाच्या अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही इजा किंवा मृत्यूसाठी कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई साठी जबाबदार असणार नाही जिथे अशी दुखापत किंवा मृत्यु अशा चांगल्या (परोपकारी) व्यक्तीच्या वैद्यकीय किंवा गैर वैद्यकीय सहाय्यता पुरविताना निष्काळजीपणामुळे सहाय्य करीत असताना अयशस्वी झाल्यामुळे झाला असेल.
२) केन्द्र शासन, नियमांद्वारे, चांगल्या व्यक्तीची विचारपूस किंवा त्याची परिक्षा करणे,त्याची संबंधित खाजगी माहिती आणि इतर बाबींसाठी उपबंध बनवू शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, चांगला (परोपकारी) व्यक्ती म्हणजे, जो व्यक्ती सद्भावपूर्वक, स्वेच्छिक आणि कोणत्याही बक्षिसाच्या किंवा नुकसान भरपाईच्या अपेक्षा विना अपघाताच्या ठिकाणी पीडित व्यक्तीला तातडीची वैद्यकीय किंवा गैर वैद्यकीय देखरेख किंवा सहाय्य उपलब्ध करुन देतो किंवा अशा पीडित व्यक्तीला रुग्णालयात पोहचवितो, ती व्यक्ती होय.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.