मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३३ :
माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य :
ज्या मोटार वाहनाचा चालक किंवा वाहक हा या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठी आरोपी असेल, अशा वाहन मालकाकडे, राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास त्याने चालक किंवा वाहक यांची नावे आणि पत्ते आणि त्याच्या ताब्यात असलेल्या किंवा वाजवी दक्षतेने त्याला निश्चित करता येईल अशा, त्यांनी धारण केलेल्या लायसनासंबंधीची माहिती दिली पाहिजे.