Mv act 1988 कलम १२ : मोटार वाहन चालविण्याचे शिक्षर देणाऱ्या शाळा किंवा आस्थापना यांना लायसन देणे व त्याचे विनियमन करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२ :
मोटार वाहन चालविण्याचे शिक्षर देणाऱ्या शाळा किंवा आस्थापना यांना लायसन देणे व त्याचे विनियमन करणे :
१) मोटार वाहने चालविणे आणि त्यासंबंधीच्या इतर बाबी याविषयीचे शिक्षण देणाऱ्या शाळश किंवा आस्थापना (मग त्या कोणत्याही नावाने संबोधण्यात येत असो) यांना राज्य शासनाकडून लायसन देण्यात येण्याच्या किंवा त्यांचे नियमन करण्याच्या प्रयोजनासाठी केंद्र शासनाला नियम करता येतील.
२) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधरणेतेला बाध न आणता अशा नियमांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी नियम करता येतील, त्या बाबी म्हणजे-
(a)क)अ) अशा शाळा किंवा आस्थापना यांना लायसन देणे आणि यात, लायसन देणे, त्याचे नवीकरण करणे आणि ते मागे घेणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो;
(b)ख)ब) अशा शाळा किंवा आस्थापना यांचे पर्यवेक्षण करणे;
(c)ग) क) अर्जाचा नमुना आणि लायसनचा नमुना आणि त्यामध्ये अंतर्भूत करावयाचे तपशील;
(d)घ) ड) अशा लायसनसाठीच्या अर्जाबरोबर भरावयाची फी;
(e)ड) ई) ज्या शर्तीना अधीन राहून असे लायसन देता येईल अशा शर्ती;
(f)च) फ) असे लायसन देण्यास किंवा त्याचे नवीकरण करण्याचे नाकारणाऱ्या आदेशांविरूद्ध अपील आणि असे लायसन मागे घेणाऱ्या आदेशाविरूद्ध अपील;
(g)छ)ज) एखाद्या व्यक्तीला मोटार वाहन चालविण्याबाबतचे शिक्षण देणारी शाळश किंवा आस्थापना ज्या शर्तींना अधीन राहून काढता येईल त्या शर्ती;
(h)ज) ह) कोणतेही मोटार वाहन चालविण्यासंबंधीचे शिक्षण, परिणामकारकपणे देणारा एक किंवा अनेक शिक्षणक्रमाचे स्वरूप अभ्यासक्रम आणि कलावधी;
(i)झ) आय) असे शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली साधने व उपकरणे (दुहेरी नियंत्रण व्यवस्था जोडण्यात आलेल्या मोटार वाहनांसह);
(j)ञ)जे) अशा शाळा किंवा आस्थापना ज्या ठिकाणी स्थापन करता येतील किंवा जेथे त्यांची व्यवस्था ठेवता येईल अशा इमारतींची योग्य आणि त्यामध्ये पुरवावयाच्या सोयी;
(k)ट) के) मोटार वाहन चालविण्याचे शिक्षण देणाऱ्या व्यक्तीने धारण करावयाच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (अनुभवासह)
(l)ठ) एल) अशा शाळा आणि आस्थापना यांची तपासणी (यामध्ये त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा, आणि असे शिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडून ठेवण्यात येणारी साधनसामग्री, उपकरणे व मोटार वाहने यांचा समावेश होता;
(m)ड) म) अशा शाळा किंवा आस्थापना यांनी अभिलेख ठेवणे;
(n)ढ) न) अशा शाळा किंवा आस्थापना यांचे आर्थिक स्थैर्य;
(o)ण) ओ) अशा शाळा किंवा आस्थापना यांनी द्यावयाचे चालकाचे प्रमाणपत्र ज्या नमुन्यात द्यावयाचे प्रमाणपत्र, कोणतेही असल्यास, आणि असे चालकाचे प्रमाणपत्र ज्या नमुन्यात द्यावयाचे तो नमुना आणि असे देण्याच्या प्रयोजनासाठी पूर्ण करणे आवश्यक असलेल्या गरजा;
(p)त) पी) या कलमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा इतर बाबी;
३) तसे करणे आवश्यक आहे याबाबत केंद्र शासनाचे समाधान होईल अशा बाबतीत, ते शासन त्याबाबतीत नियम करून, मोटार वाहन चालविण्याचे किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या बाबीचे शिक्षण देणाऱ्या शाळांच्या किंवा आस्थापनांच्या कोणत्याही वर्गाला, या कलमाच्या तरतुदींपासून सर्वसाधारणपणे एकतर पूर्णपणे किंवा त्या नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आले असेल अशा शर्तीच्या अधीनतेने सूट देऊ शकेल.
४) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी लायसनवर किंवा लायसनशिवाय मोटार चालविण्याचे किंवा त्याच्याशी संबंधित बाबींचे शिक्षण देणारी शाळा किंवा आस्थापना अशा प्रारंभापासून एक महिन्याच्या कालावधीपर्यंत, या अधिनियमाखालील असे लायसन नसताना असे शिक्षण देणे चालू ठेवू शकेल आणि जर उक्त एक महिन्याच्या कालावधीत त्याने अशा लायसनसाठी अर्ज केला अ‍ेसल, आणि असा अर्ज विहित नमुन्यात असेल, त्यात विहित तपशील असतील आणि त्यासोबत विहित फी भरण्यात आली असेल तर, लायसन देणाऱ्या प्राधिकारणाकडून असा अर्ज निकालात काढण्यात येईलपर्यंत असे शिक्षण देणे चालू ठेवू शकेल.
१.(५) इतर कोणत्याही तरतुदींमध्ये काहीही असले तरीही, एखाद्या व्यक्तिने त्यावेळी प्रवृत्त असताना इतर कोणत्याही कायद्यानुसार केंद्र सरकार द्वारे अधिसूचित केलेल्या एखाद्या मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा शाळेतून विशिष्ट प्रकारच्या मोटार वाहनांचा यशस्वीरित्या प्रशिक्षण मॉड्यूल पूर्ण केले असेल अशा व्यक्ती, विशिष्ट प्रकारच्या मोटर वाहनाचे लायसन मिळण्यास पात्र असेल.
६) पोटकलम (५) मध्ये निर्दिष्ट प्रशिक्षण मॉड्यूल आणि कलम ९ च्या पोटकलम (५) मध्ये उपचार चालक प्रशिक्षण पाठ्यक्रम तो असेल, जो केंद्र सरकार द्वारे विहित केला जाईल आणि केंद्र सरकार अशा शाळा आणि संस्थांच्या विनियमनासाठी नियम बनवू शकेल.)
———
१. २०१९ चा ३२ कलम ८ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply