Mv act 1988 कलम १२६ : अचल वाहने :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२६ :
अचल वाहने :
मोटार वाहन चालविणाऱ्या किंवा त्याच्यावर ताबा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, चालकाच्या जागेवर ते वाहन चालविण्याचे योग्य लायसन असणारी व्यक्ती असल्याशिवाय किंवा यंत्र बंद करण्यात आलेले आणि ब्रेक लावलेले असल्याशिवाय आणि चालकाच्या गैरहजेरीत ते वाहन अपघाताने चालू होणार नाही याबाबत खात्री होईल, अशा प्रकारे अन्य उपाययोजना करण्यात आल्याशिवाय असे वाहन सार्वजनिक ठिकाणी अचल राहू देणार नाही किंवा तसे राहू देण्यास अनुज्ञा देणार नाही.

Leave a Reply