मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२१ :
सिग्नल आणि सिग्नल देणारे साधन :
मोटार वाहनाच्या चालकाने, केंद्र शासनाकडून विहित करण्यात येतील असे आणि अशा प्रसंगी सिग्नल दिले पाहिजे :
परंतु उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला वळण्याबाबतचा किंवा थांबण्याबाबतचा सिग्नल-
(a)क)अ) उजव्या हाताला स्टिअरिंग नियंत्रक असेल, अशा मोटार वाहनाच्या बाबतीत, त्या वाहनात बसविण्यात आलेल्या विहित स्वरूपाच्या यांत्रिक किंवा विद्युत साधनामार्फत देता येईल; आणि
(b)ख)ब) डाव्या बाजूला स्टिअरिंग नियंत्रक असलेल्या वाहनाच्या बाबतीत त्या वाहनात बसविण्यात आलेल्या विहित स्वरूपाच्या यांत्रिक किंवा विद्युत साधनामार्फत देता येईल :
परंतु आणकी असे की, मार्गावरील क्षेत्रातील रस्त्यांची रूंदी आणि स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाला, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील, अशा शर्तींवर व अटींवर कोणत्याही मोटार वाहनाला किंवा मोटार वाहनाच्या कोणत्याही वर्गाला किंवा वर्णनाला त्या मार्गावर किंवा क्षेत्रात वाहतूक करण्याच्या प्रयोजनासाठी या कलमाच्या प्रवर्तनामधून सूट देता येईल.