मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ११ :
चालकाच्या लायसनमध्ये ज्यादा वाहने दाखल करणे :
१) कोणत्याही प्रकारचे आणि वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याचे लायसन धारण करणारी कोणतीही व्यक्ती, त्या वेळी तिला अन्य कोणत्याही प्रकारचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याचे लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास अपात्र ठरविण्यात आले नसल्यास, तिच्या मोटार वाहन लायसनमध्ये अशा अन्य वर्गाची किंवा वर्णनाची मोटार वाहने जादा दाखल करण्यासाठी, ती राहत असलेल्या किंवा कामधंदा करीत असलेल्या क्षेत्रामध्ये १.(राज्यामध्ये कोणत्याही लायसन प्रधिकाऱ्यास) केंद्र शासनाने विहित केला अशा नमुन्यात, अशी कागदपत्रे सोबत जोडून आणि अशी फी भरून अर्ज करू शकेल.
२) केंद्र शासन विहित करील अशा नियमांना अधीन राहून कलम ९ च्या तरतुदी, या कलमाखालील अर्ज हा अर्जदाराला ज्या वर्गाची आणि वर्णनाची मोटार वाहने आपल्या लायसनमध्ये जादा दाखल करून घ्यावयाची आहेत, अशा वाहनांसाठी त्या कलमाखाली करण्यात आलेला अर्ज आहे असे मानून त्याला लागू असतील :
२.(परंतु आणखी असे की, लायसन जारी (मान्य) करण्यापूर्वी केंद्र सरकार विहित केलेल्या पद्धतीने अर्जदाराची ओळख सत्यनिष्ठ करुन घेईल.)
———-
१. २०१९ चा ३२ कलम ७ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा ३२ कलम ७ द्वारा परंतुक समाविष्ट करण्यात आले.