मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १११ :
नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :
१) कलम ११० च्या पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बाबींशिवाय इतर सर्व बाबींच्या संबंधात मोटार वाहनाची किंवा अनुयानाची बांधणी करणे, ते यंत्रसज्ज करणे आणि त्याची देखभाल या बाबी विनियमित करण्यासाठी नियम करता येतील.
२) पूर्वगामी नियमाच्या सर्वसाधारणपणास बाधा न आणता, सर्वसाधारणपणे मोटार वाहने आणि अनुयान, यांच्या संबंधात किंवा विशिष्ट वर्गाच्या किंवा वर्णनाच्या मोटार वाहनाच्या किंवा अनुयानाच्या संबंधात किंवा विशिष्ट परिस्थितीच्या संबंधात, पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींचे नियमन करणारे नियम या कलमाखाली करता येतील, त्या बाबी अशा-
(a)क)अ) सार्वजनिक सेवा वाहनातील आसन व्यवस्था आणि प्रवशांचे हवामानापासून संरक्षण;
(b)ख)ब) विशिष्ट वेळी व विशिष्ट ठिकाणी ऐकू येण्याजोग्या सिग्नलचा वापर करण्यास मनाई करणे किंवा त्यावर निर्बंध घालणे
(c)ग) क) त्रास होण्याचा संभव असलेली किवा धोकादायक उपयंत्रे बरोबर नेण्यास मनाई करणे,
(d)घ) ड) विहित प्राधिकरणांद्वारे वाहनांची नियतकालिक चाचणी व तपासणी करणे. (आणि अशा चाचण्यांसाठी आकरावयाची फी);
(e)ड) ई) नोंदणी चिन्हाखेरीज वाहनावर दर्शवावया तपशील व तो कशा रीतीने दर्शवावयाचा ती रीत;
(f)च) फ) मोटार वाहनांबरोबर अनुयानाचा वापर करणे; आणि
२.(***)
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३३ अन्वये मजकूर वगळण्यात आला.