मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १० :
चालकाच्या लायसनचा नमुना व त्यातील आशय (मजकूर) :
१) कलम १८ अन्वये देण्यात आलेल्या लायसनखेरजी चालकाचे आणि शिकाऊ व्यक्तीचे प्रत्यक लायसन केंद्र सरकार विहित करील अशा नमुन्यात असेल पाहिजे आणि त्यात अशा प्रकारे विहित करण्यात येतील असे तपशील व असा आशय असला पाहिजे.
२) शिकाऊ व्यक्तीसाठी असलेल्या लायसनमध्ये किंवा चालकाच्या लायसनमध्ये, ते धारण करणाऱ्या व्यक्तीला पुढीलपैकी एका किंवा अधिक प्रकारची मोटार वाहने चालविण्यासाठी पात्र ठरविण्यात आले असल्याचे व्यक्त करण्यात आले पाहिजे; ते वाहन प्रकार म्हणजे :
(a)क) अ) मोटार सायकल गिअर नसलेली;
(b)ख) ब) मोटार सायकल गिअर असलेली;
(c)ग) क) १.(रुपांतरित वाहन (अॅडप्टेड वाहन);
(d)घ) ड) हलके मोटार वाहन;
(e)ड) २.(ई) परिवहन वाहन)
(i)झ)आय) रोड रोलर :
(j)ञ) जे) विनिर्दिष्ट वर्णनाचे मोटार वाहन.
———–
१. २०१९ चा ३२ कलम ६ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रं. ५४ कलम ८ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.