मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०६ :
वाहनामध्ये आढळून आल्या असतील अशा वस्तू निकालात काढणे :
राज्य परिवहन उपक्रमाकडून चालविण्यात येणाऱ्या कोणत्याही परिवहन वाहनात आढळून आलेल्या कोणत्याही वस्तूची तिच्या मालकाने विहित कालावधीत मागणी केली नाही, तर राज्य परिवहन उपक्रमाला विहित रीतीने त्या वस्तूंची विक्री करता येईल आणि विक्रीचे उत्पन्न त्यामधून आनुषंगिक खर्च वजा करून मागणी करण्यात आल्यावर ते मालकाला देण्यात येईल.