मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०४ :
अधिसूचित क्षेत्र किंवा मार्ग याबाबत परवाना देण्यावर निर्बंध :
कोणत्याही अधिसूचित क्षेत्राच्या किंवा अधिसूचित मार्गाच्या बाबत १०० च्या पोट-कलम (३) नुसार एखादी योजना प्रसिद्ध करण्यात आली असेल, अशा बाबतीत राज्य परिवहन प्राधिकरण किंवा यथास्थिति प्रादेशिक परिवहन प्राधिकरण या योजनेच्या तरतुदींना अनुसरून असेल ते वगळता कोणताही परवाना देणार नाही.
परंतु, मान्य करण्यात आलेल्या योजनेनुसार कोणत्याही अधिसूचित क्षेत्राच्या किंवा अधिसूचित मार्गाच्या संबंधात राज्य परिवहन उपक्रमाने परवान्याकरिता कोणताही अर्ज केला नसल्यास, त्या क्षेत्राच्या किंवा मार्गाच्या संबंधात राज्य परिवहन उपक्रमाकडून परवाना देण्यात आल्यानंतर असा तात्पुरता परवाना अमलात असण्याचे बंद होईल या शर्तीच्या अधीन राज्य परिवहन प्राधिकरण किंवा यथास्थिती, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अशा अधिसूचित क्षेत्राच्या किंवा अइिसूचित मार्गाच्या संबंधित कोणत्याही व्यक्तीला तात्पुरता परवाना देऊ शकेल.