Mv act 1988 कलम १०३ : राज्य परिवहन उपक्रमाला परवाना देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०३ :
राज्य परिवहन उपक्रमाला परवाना देणे :
१) मान्य करण्यात आलेल्या योजनेनुसार कोणत्याही राज्य परिवहन उपक्रमाने अधिसूचित क्षेत्राच्या किंवा अधिसूचित मार्गाच्या संबंधात टप्पा गाडी परवाना किंवा मालवाहून वाहन परवाना किंवा करारावरील वाहन परवाना मिळण्यासाठी राज्य शासन त्या बाबतीत विहित करील अशा रीतीने अर्ज केला असेल, अशा बाबतीत प्रकरण पाच मध्ये या विरूद्ध काहीही अतूंर्भत असले तरी, सदर क्षेत्र किंवा उक्त नियत मार्ग एकापेक्षा अधिक प्रदेशात असेल, अशा कोणत्याही बाबतीत राज्य परिवहन प्राधिकरण राज्य परिवहन उपक्रमाला असा परवाना देईल.
२) एखाद्या अधिसूचित क्षेत्राच्या किंवा अधिसूचित मार्गाच्या बाबतीत मान्य करण्यात आलेली योजना अमलात आणऱ्याच्या प्रयोजनासाठी संबंधित राज्य परिवहन प्राधिकरण किंवा यथास्थिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आदेशाद्वारे –
(a)क)अ) अन्य कोणत्याही परवान्यासाठी किंवा त्याच्या नवीकरणासाठी करण्यात आलेला कोणातही अर्ज स्वीकारण्याचे नाकारू शकेल किंवा प्रलंबित असेल असा कोणताही अर्ज नाकारू शकेल;
(b)ख)ब) कोणताही विद्यमान परवाना रद्द करू शकेल;
(c)ग) क) एक) विनिर्दिष्ट दिनांकानंतर परवाना निष्प्रभावी करण्यासाठी
दोन) परवान्यान्वये वापर करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी
तीन) परवाना अधिसूचित क्षेत्राशी किंवा अधिसूचित मार्गाशी जितपत संबंधित असेल, तितपत परवान्यात समाविष्ट असलेले क्षेत्र किंवा मार्ग यात कपात करण्यासाठी, कोणत्याही विद्यमान परवान्याच्या अटीमध्ये फेरबदल करू शकेल.
३) शंका निरसनासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येत आहे की, राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा यथास्थिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) नुसार केलेल्या कोणत्याही कार्यवाहीविरूद्ध किंवा त्याने दिलेल्या आदेशाविरूद्ध कोणतेही अपील दाखल करता येणार नाही.

Leave a Reply