Site icon Ajinkya Innovations

JJ act 2015 कलम ८३ : अतिरेकी गटाने किंवा इतर प्रौढ व्यक्तींनी बालकाचा वापर करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८३ :
अतिरेकी गटाने किंवा इतर प्रौढ व्यक्तींनी बालकाचा वापर करणे :
१) केन्द्र सरकारने दहशतवादी व फुटिरतावादी कारवाया करणाऱ्या म्हणून जाहीर केलेल्या, कोणत्याही कारणाने बालकास कोणत्याही कामासाठी भरती केले, तर त्यास सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची सश्रम (कठोर) कारावासाची आणि पाच लाख रुपये दंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
२) कोणत्याही प्रौढ व्यक्तीने किंवा प्रौढ व्यक्तींच्या गटाने एखाद्या बालकास, एकट्याने किंवा गटाने करावयाच्या बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरले तर ते सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या सश्रम कारावासाची आणि पाच लाखा रुपये दंडाच्या शिक्षसही पात्र ठरतील.

Exit mobile version