Site icon Ajinkya Innovations

JJ act 2015 कलम ७ : मंडळाच्या संबंधातील कार्यपद्धती :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७ :
मंडळाच्या संबंधातील कार्यपद्धती :
१) मंडळ, विहित केले असेल अशा वेळी बैठका घेईल आणि आपल्या बैठकीत चालविण्यात येणाऱ्या कामकाचाशी संबंधीत असलेल्या कार्यपद्धतीच्या नियमांचे पालन करील आणि सर्व प्रक्रिया बालअनुकूल आहेत आणि असे ठिकाण हे मुलांना धोक्याचे किंवा त्रासाचे किंवा नियमित न्यायालया सारखे नसावे, हे सुनिश्चित करील.
२) कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाला, ज्यावेळी मंडळाची कारवाई सुरु नसेल त्यावेळी मंडळाच्या सभासदासमक्ष हजर करता येईल.
३) मंडळाचा कोणताही सदस्य अनुपस्थित असला तरीही, मंडळ कृती करु शकेल आणि मंडळाने दिलेला कोणताही आदेश, कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणताही सदस्य अनुपस्थित होता एवढ्या एकाच कारणास्तव विधीअग्राह्य ठरणार नाही :
परंतु प्रकरणाच्या अंतिम निकालाच्या वेळी किंवा कलम १८ च्या पोटकलम (३) अन्वये आदेश देताना मुख्य दंडाधिकाऱ्यासह किमान दोन सदस्य हजर असणे आवश्यक आहे.
४) अंतरिम किंवा अंतिम निकालाच्या वेळी, मंंडळाच्या सदस्यांमध्ये कोणताही मतभेद उद्भवल्यास, बहुमत अधिभावी होईल, परंतु जेव्हा तेथे असे बहुमत नसेल तेव्हा, मुख्य दंडाधिकाऱ्याचे मत अधिभावी होईल.

Exit mobile version