बाल न्याय अधिनियम २०१५
कलम २९ :
समितीचे अधिकार :
१) देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या देखभाल, संरक्षण, उपचार, विकास आणि पूर्नवसनाबाबत तसेच अशा बालकांच्या प्राथमिक गरजा आणि संरक्षणाबाबतच्या प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार समितीला असतील.
२) जर कोणत्याही विभागासाठी समितीचे गठण झालेले असल्यास, त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही अधिनियमात काहीही नमूद केलेले असले तरी सदर समितीला देखभाल आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकाच्या, काळजी आणि संरक्षणाबाबत या अधिनियमान्वये जर काही विशिष्ट संबंधात आदेश दिलेले नसल्यास, या अधिनियमान्वये कारवाईचे सर्व अधिकार असतील.
