बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ९४ :
गृहितक आणि वय निश्चिती (वयाचा अंदाज आणि निर्धारण) :
१) साक्ष नोंदविण्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीनुसार समिती किंवा मंडळासमोर आलेली व्यक्ती सकृतदर्शनी बालक दिसत असेल तर समिती किंवा मंडळ त्यांची निरीक्षणे नोंदवून बालकाचे अंजाचे वय नमूद करतील आणि वयाबाबत जास्त खात्री करण्याची वाट न पाहता, यथास्थिती, कलम १४ किंवा कलम ३६ अन्वये चौकशी पुढे सुरु ठेवतील.
२) जर समिती किंवा मंडळास, त्यांच्यापुढे आणलेली व्यक्ती बालक आहे किंवा नाही, याबाबत रास्त शंका असल्यास, यथास्थिती, समिती किंवा मंडळ वय निश्चिती करण्यासाठी निम्नलिखित संदर्भात पुरावे हजर करुन घेईल,-
एक) शाळेमधून जन्मतारखेचे प्रमाणपत्र, किंवा शालांत परीक्षेचे किंवा त्यासारखे परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास; आणि ते उपलब्ध नसल्यास;
दोन) महानगरपालिकेचे किंवा नगरपालिका प्रशासनाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र;
तीन) आणि केवळ पोट-कलम (१) किंवा (२) मधील प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास, समिती किंवा मंडळाच्या आदेशाने ऑसिफिकेशन चाचणीने (अस्थि चाचणी) किंवा दुसऱ्या अद्ययावत वैद्यकीय वय निश्चिती चाचणीच्या सहाय्याने :
परंतु असे की, समिती किंवा मंडळाच्या आदेशाने केलेली वय निश्चिती चाचणी आदेश दिल्यापासून १५ दिवसाच्या आत केली गेली पाहिजे.
३) समिती किंवा मंडळा द्वारा त्याचे समक्ष आणलेल्या व्यक्तीचे नोंदविलेले वय या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, त्या व्यक्तीचे खरे वय समजले जाईल.